एक्स्प्लोर

मुंबई रेल्वे प्रकल्पांसाठी निधीत काटछाट!

मुंबईकरांना त्याचा फायदा होतो. मात्र यावर्षी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार एमआरव्हीसीला 575 कोटी देण्यात आले आहेत.

मुंबई : अर्थसंकल्पात मुंबईसाठी आणि मुंबईच्या रेल्वेसाठी किती कोटींची तरतूद करण्यात आली याकडे सर्व मुंबईसह महाराष्ट्राचे देखील लक्ष असते. त्यात मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना देण्यात आलेल्या निधीचे आकडे एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. या आकड्यांवरून हेच स्पष्ट होत आहे की, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी मुंबईच्या मोठ्या रेल्वे प्रकल्पांसाठी कमी निधी देण्यात आला आहे.

मुंबईतील मोठे रेल्वे प्रकल्प हे मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन पूर्ण करत आहे. याच एमआरव्हीसीला जास्तीत जास्त निधी देण्याची आवश्यकता असते. तरच मुंबईकरांना त्याचा फायदा होतो. मात्र यावर्षी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार एमआरव्हीसीला 575 कोटी देण्यात आले आहेत. मात्र मागील वर्षाचा विचार केल्यास एमआरव्हीसीला 650 कोटी रुपये देण्यात आले होते. म्हणजेच या वर्षी 75 कोटी कमी निधी मुंबईसाठी केंद्राने दिला आहे.

एमआरव्हीसीचे सध्या तीन फेजमध्ये विविध प्रकल्प सुरू आहेत. यापैकी मुंबई अर्बन रेल प्रोजेक्ट म्हणजेच एम युटीपी दोन मधील प्रकल्पांना यावर्षी 185 कोटी मंजूर करण्यात आले. या फेज साठी गेल्यावर्षी 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. एमयुटीपी तीन मधील प्रकल्पांसाठी यावर्षी 190 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. एमयुटीपी तीनसाठी गेल्या वर्षी तीनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. तर एम यु टी पी 3 ए मधील प्रकल्पांसाठी यावर्षी 200 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र गेल्या वर्षी याच फेजसाठी 150 कोटी रुपये देण्यात आले होते.

यावर्षी मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे मुंबई लोकल हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि निवडणुकांसाठी महत्त्वाचा विषय मानला जातो. मात्र केंद्राने मुंबईकरांसाठी निधीमध्ये काटछाट करून मुंबईकरांची उपेक्षाच केली आहे. सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी भरघोस निधी देण्याची आवश्यकता होती. मात्र केंद्राने उलट निधीत कमतरता केल्याने येणाऱ्या काळात यावरून राजकारण रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Tiger Shroff attack: जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Ramdas Kadam : शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; तुम्हाला कोणी संपवत नाही, रामदास कदम यांचं प्रत्युत्तर
शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; रामदास कदम यांचं प्रत्युत्तर
जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा

Embed widget