Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढतोय, शुक्रवारी 683 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
Mumbai Corona Update : मुंबईचा कोरोनामुक्त रुग्णांचा दर 97 टक्के इतका आहे. तर 3 हजार 227 सक्रिय रुग्ण आहेत.

Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. तीन दिवसांपासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी मुंबईत नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी 602, बुधवारी 490 रुग्णांची नोंद झाली होती. 21 डिसेंबर म्हणजेच मंगळवारी मुंबईत 327 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. चार दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कोरोना फोफावतोय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णाचा स्फोट होईल, असेही सांगितले जातेय. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईमध्ये 683 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत 267 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत आतापर्यंत सात लाख 47 हजार 258 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा कोरोनामुक्त रुग्णांचा दर 97 टक्के इतका आहे. मुंबईत 3 हजार 227 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईचा कोरोना दुपटीचा दर 1536 दिवस इतका झालाय. 17 डिसेंबर ते 23 डिसेंबरदरम्यान मुंबईतील कोरोना रुग्णाचा दर 0.05 टक्के इतका झालाय.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 24, 2021
२४ डिसेंबर, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण- ६८३
२४ तासात बरे झालेले रुग्ण-२६७
बरे झालेले एकूण रुग्ण-७४७२५८
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%
एकूण सक्रिय रुग्ण-३२२७
दुप्पटीचा दर-१५३६ दिवस
कोविड वाढीचा दर (१७ डिसेंबर-२३ डिसेंबर)-०.०५%#NaToCorona
मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही मुंबईत सध्या सील केलेल्या इमारतींची संख्या 14 आहेत. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
























