एक्स्प्लोर

Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्येतील वाढ कायम; आजही रुग्णसंख्या दोन हजारांहून अधिक; 2366 नवे कोरोनाबाधित

Mumbai Corona Update : मागील काही दिवसांपासून कोरोनारुग्ण पुन्हा वाढू लागले असून आज 2366 नवे कोरोनाबाधित आढळले असून 1700 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Mumbai Coronavirus Cases : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. बऱ्याच काळापासून आटोक्यात आलेल्या रुग्णसंख्येने आता पुन्हा वाढण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांसह प्रशसनाची चिंता वाढू लागली आहे. दरम्यान बुधवारी दोन हजारांच्या पार रुग्णसंख्या पोहोचल्यानंतर आजही रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील 24 तासांत मुंबईत 2366 नवे बाधित समोर आले आहेत. बुधवारी हीच रुग्णसंख्या 2293 होती दरम्यान रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांनाही काळजी घेणं अनिवार्य झालं आहे. 

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 2 हजार 366 नवे कोरोनाबाधित आढळले असून 1700 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसंच दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुपटीचा दरही वाढत असल्याने चिंतेचं कारण आणखी वाढलं आहे. 419 दिवसांवर आता हा दर पोहोचला आहे.

राज्यातील रुग्णसंख्या 4 हजार पार

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात चार हजार 255 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी राज्यात 4024 रुग्ण आढळले होते. त्यातुलनेत आज राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासात 2879 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्ताची संख्या 7755183 इतकी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 97.87% एवढे झाले आहे. भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, (नीरी) नागपूर यांच्या ताज्या अहवालानुसार नागपूर येथे बीए. 5 व्हेरियंटचे 2 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एक रुग्ण २९ वर्षीय पुरुष असून दुसरा रुग्ण 54 वर्षाची महिला आहे. त्यांनी मागील आठवडयात  अनुक्रमे केरळ आणि मुंबई येथे प्रवास केला आहे. दिनांक 6 आणि 9 जून 22 रोजी ते कोविड बाधित आढळले होते.  या दोघांचेही लसीकरण झालेले असून हे दोन्ही रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.4 आणि बीए.5 रुग्णांची संख्या 19 झाली आहे.

हे ही वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour ABP Majha : गावागावातील मुलींना ड्रोन पायलट करणार, Narendra Modi यांची मोठी घोषणाVidarbha SuperFast Update : विदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा : 19 एप्रिल 2024 एबीपी माझाZero Hour : Supriya Sule यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पवार कुटुंब एकवटलं, दादा एकटे पडलेत?Vidarbha Election Update : विदर्भात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अंदाजे 55.35 टक्के मतदान ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
Embed widget