एक्स्प्लोर

Maharashtra MLC Election | भाजपने ऐनवेळी विधानपरिषद उमेदवार बदलला!

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपला एक उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी भाजपकडून रमेश कराड यांनी उमेदवारी देण्यात आली.

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने चौथा उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून रमेश कराड भाजपचे चौथे उमेदवार असतील. रमेश कराड हे लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (11 मे) शेवटचा दिवस होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीच्या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यांच्यासोबतच भाजपकडून रमेश कराड यांनीही उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. रमेश कराड यांनी अचानक मुंबईत येऊन अर्ज भरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार की डमी म्हणून वापर होणार अशी चर्चा रंगली होती. परंतु भाजपने डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांना आपला अधिकृत उमेदवार केलं.

Maharashtra MLC Election | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज भरला 

भाजपचे उमेदवार कोण? भाजपकडून 8 मे रोजीच विधानपरिषदेसाठी डॉ. अजित गोपछडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. त्याच दिवशी त्यांनी उमेदवारी अर्जही भरले होते. भाजपकडून दिग्गजांना डावलत विधानपरिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी आहे. परंतु विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून रमेश कराड यांनीही अर्ज भरल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पक्षाने जाहीर केलेल्यांपैकी एकाचा पत्ता कट होऊन रमेश कराड यांची वर्णी लागेल, असा अंदाजही वर्तवला जात होता. हीच शक्यता खरी ठरत रमेश कराड आता भाजपचे अधिकृत उमेदवार बनले आहेत.

भाजपकडून नव्या चेहऱ्यांना विधानपरिषदेवर संधी, का कापला भाजपमधील दिग्गजांचा पत्ता?

Maharashtra MLC Election | भाजपने ऐनवेळी विधानपरिषद उमेदवार बदलला!

कोण आहेत रमेश कराड? रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले. लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला.

पाच दिवसात राष्ट्रवादी का सोडली? रमेश कराड म्हणतात...

पंकजांचा मास्टरस्ट्रोक, रमेश कराड यांचा अर्ज मागे!

21 मे राजी विधानपरिषद निवडणूक कोरोना व्हायरसमुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेलाच मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Embed widget