Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावर संक्रांत! शरद पवारांकडून मुंडेंवर कारवाईचे संकेत
बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसे संकेत राष्ट्रावादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी दिले आहे. धनंजय मुंडे यांचे भवितव्य आता थोरले पवार ठरवणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, शरद पवारांकडून नवाब मलिक यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
![Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावर संक्रांत! शरद पवारांकडून मुंडेंवर कारवाईचे संकेत Maharashtra minister Dhananjay Munde rape case Sharad Pawar gives clean chit to Nawab Malik, hints of action on Munde Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावर संक्रांत! शरद पवारांकडून मुंडेंवर कारवाईचे संकेत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/14150443/Dhananjay-Munde_sharadpawar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बलात्काराचा आरोप व विवाहबाह्य संबंधाची स्वतःच दिलेली कबुली, यामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली असली तरी मुंडे यांच्या भवितव्याचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील, असे संकेत राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्याने आज दिले आहेत.
धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी याबाबत फेसबुकद्वारे स्पष्टीकरण करताना 'त्या' महिलेचा बलात्काराचा आरोप फेटाळून लावला. परंतु, त्याचवेळी तक्रारदार महिलेच्या बहिणीबरोबर आपले गेल्या 17-18 वर्षांपासून संबंध असून या संबंधातून दोन अपत्यं असल्याचीही कबुलीही त्यांनी स्वतःच दिली आहे. यानंतर भाजपने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी बुधवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबतची वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली.
Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार
यानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची जोरदार पाठराखण केल्याचे समजते. परंतु, पक्षाच्या प्रतिमेवर याचा होणारा परिणाम लक्षात घेऊन काही निर्णय घ्यावे लागतील, असा अन्य नेत्यांचा सूर होता. याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच अंतिम निर्णय घेतील असे बैठकीत ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही भाजपच्या महिला आघाडीने, तसेच माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असली तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र नरमाईची भूमिका घेतली आहे.
..तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही : जयंत पाटील या गोष्टींचा आढावा पक्षांतर्गत जरुर घेतला जाईल आणि आवश्यकता भासली तर मुख्यमंत्र्यांशीही याबाबतीत चर्चा करु. तथ्याच्या आधारावर योग्य ती भूमिका घेऊ. कोणीतरी आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही. पण याबाबतीत आम्ही पक्षस्तरावर योग्य तो विचार करणार आहोत. महिला आरोप करते, धनजंय मुंडेंनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. असं असताना धनंजय मुंडेंना कोणीतरी जाणीवपूर्वक ब्लॅकमेल करत असेल आणि त्यात त्यांचा दोष नसेल तर राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून तातडीनं निर्णय घेऊ : शरद पवार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)