Uddhav Thackeray Speech Live: प्रतिज्ञापत्र लाखोंच्या संख्येनं दिली ती काय रद्दी होती? उद्धव ठाकरे यांची केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका
Maharashtra News LIVE Updates : आज दिवसभरात घडणाऱ्या ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : राज्यात आजचा दिवस हा राजकीय घडामोडींचा असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये (Malegaon) जाहीर सभा होणार आहे. तर, भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांची नांदेडमध्ये (Nanded) जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत काही महत्त्वाचे नेते पक्ष प्रवेश करणार आहेत. दरम्यान, मालेगवाच्या आजच्या सभेत ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. पाहुयात आज दिवसभरात कुठे काय होणार.
काँग्रेसचं राज्यात आंदोलन
राहुर गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. आज काँग्रेसच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.
राजघाटावर प्रियांका गांधी या एक दिवसाचा सत्याग्रह करणार आहेत.
मुंबई: राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात आज मुंबई काँग्रेसचा केंद्र सरकार विरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात माजी खासदार मिलींद देवरा, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, मधू चव्हाण यांच्यासह अन्य नेते सहभागी होणार आहेत.
नागपूर: नागपूरच्या व्हरायटी चौकात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन होणार आहे. याला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी होण्याची शक्यता आहे.
मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये (Malegaon) जाहीर सभा होणार आहे. मालेगवाच्या आजच्या सभेत ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची सभा
भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांची नांदेडमध्ये (Nanded) जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत काही महत्त्वाचे नेते पक्ष प्रवेश करणार आहेत.
संचार कंपनीचे वनवेबचे 36 उपग्रह अंतराळात सोडले
श्रीहरिकोटा इथून आज इस्त्रो आज एलव्हीएम 3 च्या माध्यमातून ब्रिटनच्या संचार कंपनीचे वनवेबचे 36 उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत.
Uddhav Thackeray Speech Live: सावरकर हे आमचे दैवत आहे...त्यांचा अपमान सहन करणार नाही; उद्धव यांचा राहुल गांधी यांना इशारा
Uddhav Thackeray Speech Live: सावरकर हे आमचे दैवत आहे...त्यांचा अपमान सहन करणार नाही; उद्धव यांचा राहुल गांधी यांना इशारा
Uddhav Thackeray Speech Live: जोपर्यंत रामशास्त्री बण्याचे न्यायाधीश आहेत तो पर्यंत लोकशाही आहे; उद्वव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास
Uddhav Thackeray Speech Live: जोपर्यंत रामशास्त्री बण्याचे न्यायाधीश आहेत तो पर्यंत लोकशाही आहे; उद्वव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास
Uddhav Thackeray Speech Live: निवडणूक आयोगाच्या डोळ्यांत मोती बिंदू झाले नसेल तर खेड आणि मालेगांवची सभा बघा; उद्धव ठाकरे यांची केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका
Uddhav Thackeray Speech Live: निवडणूक आयोगाच्या डोळ्यांत मोती बिंदू झाले नसेल तर खेड आणि मालेगांवची सभा बघा. प्रतिज्ञापत्र लाखोंच्या संख्येनं दिली ती काय रद्दी होती? उद्धव ठाकरे यांची केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका
Uddhav Thackeray Speech Live: दिल्लीने डोळे वटारले तर हे मिठाची गुळणी करतात; उद्धव ठाकरे यांची शिंदे गटावर टीका
Uddhav Thackeray Speech Live: दिल्लीने डोळे वटारले तर हे मिठाची गुळणी करतात; उद्धव ठाकरे यांची शिंदे गटावर टीका
Uddhav Thackeray Speech Live: शेतकऱ्यांना कर्ज मुक्त का करत नाही हे सांगण्यासाठी उत्तर सभा घ्या; मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर उद्धव यांची टीका
Uddhav Thackeray Speech Live: शेतकऱ्यांना हमीभाव नाही हमखास भाव मिळाले पाहिजे. मला उत्तर देण्यासाठी उत्तर सभा घेणार या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त का करत नाही हे सांगण्यासाठी उत्तर सभा घ्या. मुख्यमंत्र्यांना शेतकरी रक्ताने पत्र लिहितो पण पत्र वाचले नाही.