एक्स्प्लोर

दोस्तीत कुस्ती नाही, पण कुस्तीत मात्र दोस्ती नाही: अभिजीत कटके

अभिजीत आणि किरण हे सख्खे दोस्त आहेत. मात्र महाराष्ट्र केसरी या मानाच्या किताबासाठी या दोघांची ‘दोस्तीत कुस्ती’ होती.

पुणे: अवघ्या 22 वर्षांचा पैलवान अभिजीत कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. भूगावच्या कुस्ती आखाड्यात मॅटवर अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला धूळ चारत, महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. अभिजीतने किरणवर 10-7 अशी मात केली. महत्त्वाचं म्हणजे अभिजीत आणि किरण हे सख्खे दोस्त आहेत. मात्र महाराष्ट्र केसरी या मानाच्या किताबासाठी या दोघांची ‘दोस्तीत कुस्ती’ होती. या विजयानंतर अभिजीतने एबीपी माझाशी खास गप्पा मारल्या. महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर अभिजीतच्या वडिलांनी लाडक्या लेकाला लॅण्ड क्रूझर गाडी देण्याचं आश्वासन दिलं. मात्र यावेळी अभिजीतने वडिलांनी लावलेल्या कडक शिस्तीबद्दल सांगितलं. सकाळी सहा वाजल्यापासून माझ्यावर पप्पांचं लक्ष असतं, पप्पांमुळे मी घडलो, असं अभिजीत म्हणाला. याशिवाय शिवराजदादा तालीम आणि अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाड या वस्तादांनी माझ्यावर मेहनत घेतल्याचं अभिजीतने सांगितलं. दोस्तीत कुस्ती नाही, पण कुस्तीत मात्र दोस्ती नाही: अभिजीत कटके कुस्तीत दोस्ती नाही अभिजीत आणि किरण हे सख्खे दोस्त आहेत. सोनीपतच्या राष्ट्रीय शिबिरात ही दोस्ती जमली. एकच वय आणि आवडनिवडही कुस्तीचीच. त्यामुळं त्यांच्यातली दोस्ती आणि कुस्तीही बहरली. पण महाराष्ट्र केसरीच्या निमित्ताने हे सख्खे दोस्त एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. याबाबत विचारलं असता, अभिजीत म्हणाला, “दोस्ती तुटायची नाही. पण कुस्तीत दोस्ती नसती. मॅटवर दोस्ती नाही, बाहेर दोस्ती. रिंगणात सख्ख्या भावाशी पण दोस्ती नाही”. व्हिडीओ बघून त्यांना हरवलं विरोधी पैलवानांबाबतची रणनीती कशी आखली याबाबत अभिजीतने सांगितलं. तो म्हणाला, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदा कोण कोण खेळू शकतं, याचे व्हिडिओ मी गेली वर्षभर बघितले. त्यावरुन त्यांच्यावर मी तोड काढली आणि आज मी विजयी झालो. ऑलिम्पिक पदक महाराष्ट्र केसरी तर आता झाली, आता माझं लक्ष्य हिंदकेसरी, कॉमनवेल्थ गेम आणि त्यापुढे टोकिओ ऑलिम्पिक पदकावर आहे, असं अभिजीत म्हणाले. वडिल प्रशिक्षणासाठी जॉर्जियाला पाठवण्यास तयार आहेत. तिकडे जाण्याचा फायदा म्हणजे टेक्निक सुधारेल, असा त्याला विश्वास आहे. VIDEO: संबंधित बातम्या महाराष्ट्र केसरीसाठी दोस्तीत कुस्ती, सख्खे मित्र फायनलमध्ये भिडणार पुण्याचा पैलवान अभिजीत कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी!

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Samadhan Sarvankar On Shivsena UBT Vishakha Raut: व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
BMC Fellowship Programme: 61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, BMC फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; अवघ्या 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, महापालिका फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Embed widget