IAS officers transfers: राज्यातील सनदी अधिकाऱ्यांची खांदेपालट; अश्विनी भिडे, अभिजित बांगरांची बदली कुठे झाली?
Maharashtra News: राज्यातील एकूण 12 सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. अश्विनी भिडे या मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर कार्यरत होत्या. आता त्यांची बदली मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या संचालकपदी करण्यात आली आहे.

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशानंतर राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या खांदेपालटीचे सत्र सुरु झाले आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची नुकतीच बदली करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणावर राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS officers transfer) करण्यात आल्या. यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांचा समावेश आहे. अभिजीत बांगर तीन वर्षांहून अधिक काळापासून ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. मात्र, आता त्यांना मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार मंगळवारी सांगली जिल्ह्यातील रहिवासी असल्याने सांगली महापालिका आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. तर महापालिका उपायुक्त राहुल रोकडे व पंडित पवार यांचीही बदली झाली.
राज्यातील बदली झालेल्या सनदी अधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे:
1.श्री अमित सैनि, अभियान संचालक, जलजीवन मिशन यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर.
2.श्री संजय मीना यांची नियुक्ती महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.
3.श्री राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती आयुक्त, सहकार व निबंधक, सहकारी संस्था पुणे या पदावर.
4.श्री विशाल नरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे या पदावर.
5. श्री अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे मनपा यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर.
6. श्री अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा या पदावर.
7. श्री कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर.
8. श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक , मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन या पदावर.
9. श्री संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर.
10. श्री शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर.
11. श्री पृथ्वीराज बी.पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा या पदावर.
12. डॉ. कुमार खेमनार अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा यांची नियुक्ती आयुक्त, साखर, पुणे या पदावर.
आणखी वाचा
निवडणूक आयोगानं बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना हटवलं
























