एक्स्प्लोर

'ठाकरे सरकार'मध्ये 'या' नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता

मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पार्क येथे गुरुवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. ठाकरे कुटुंबातील उद्धव हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे पहिले सदस्य आहेत.

मुंबई : सत्तास्थापनेच्या अनेक घडामोडीनंतर अखेर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेतेपदी निवड झालेले उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्या, 28 तारखेला शपथ घेणार आहेत. तर राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन नेते शपथ घेतील. उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सध्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत आहेत. यासोबतच मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याची देखील चर्चा सुरु झाली आहे. या यादीमध्ये कुणाला स्थान मिळणार याची उत्सुकता लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खालील नेत्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
राष्ट्रवादी 
अजित पवार 
जयंत पाटील 
दिलीप वळसे पाटील 
हसन मुश्रीफ 
छगन भुजबळ 
नवाब मलिक 
राजेश टोपे 
अनिल देशमुख 
धनंजय मुंडे  
जितेंद्र आव्हाड
 
काँग्रेस 
अशोक चव्हाण 
पृथ्वीराज चव्हाण 
विजय वडेट्टीवार 
सतेज पाटील 
यशोमती ठाकूर 
के सी पाडवी 
विश्वजित कदम 
सुनील केदार 
नितीन राऊत किंवा नाना पटोले 
वर्षा गायकवाड 
 
शिवसेना 
एकनाथ शिंदे 
सुभाष देसाई 
गोपीकिशन बाजोरिया 
सुनील प्रभू 
अनिल परब 
उदय सामंत 
दीपक केसरकर 
तानाजी सावंत 
गुलाबराव पाटील 
संजय राठोड 
आशिष जायस्वाल 
 
इतर पक्ष 
राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) 
बच्चू कडू (प्रहार) 
महाविकासआघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा काल करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. उद्या 28 तारखेला उद्धव ठाकरे हे सायंकाळी 6.40 मिनिटांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.  आज सर्व आमदारांना शपथ विधानसभेत देण्यात आली. यावेळी विधानभवनात येणाऱ्या प्रत्येक आमदाराचे स्वागत सुप्रिया सुळे यांनी केले. यावेळी बंडखोरी करुन भाजपसोबत सरकार स्थापन करुन त्यानंतर राजीनामा देऊन परत आलेल्या अजित पवार यांची सुप्रिया सुळे यांनी गळाभेट घेत स्वागत केले.
अब की बार... ठाकरे सरकार! शपथविधी सोहळा कसा असणार?
 
दरम्यान, मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पार्क येथे गुरुवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. ठाकरे कुटुंबातील उद्धव हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे पहिले सदस्य आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget