एक्स्प्लोर

100 crore extortion case : 100 कोटींच्या खंडणी प्रकरणाला नवीन वळण; चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेचा मोठा खुलासा

Antilia Bomb Scare Case : चांदिवाल आयोगासमोर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे.

Anil Deshmukh  Sachin Waze 100 Crore Extortion Case : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींची खंडणी मागितली असल्याच्या प्रकरणात आता नवीन वळण आले आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिली आहे. अनिल देशमुख यांनी कधीही पैशांची मागणी केली नसल्याचे वाझेने म्हटले. चांदीवाल आयोगासमोर आज वाझेचा जबाब नोंदवला. 

मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यानंतर तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर आरोप लावले होते. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेला 100 कोटींची खंडणी जमा करायला सांगितल्याचा आरोप या पत्रात होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना या खंडणीच्या आरोपात आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर, राज्य सरकारने परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चांदिवाल आयोगाची नेमणूक केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आधीपासून 100 कोटीच्या खंडणीचे आरोप फेटाळून लावले होते. 

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने आज चांदिवाल आयोगासमोर जबाब नोंदवला. अनिल देशमुख यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी त्यांची उलट तपासणी केली. यावेळी सचिन वाझेने अनिल देशमुख अथवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याकडून पैशांची मागणी करण्यात आली नव्हती असे म्हटले. त्याशिवाय आपण कोणत्याही बार मालकाकडून अथवा त्यांच्याशी संबंधितांकडून पैसे घेतले नाही असेही वाझेने आपल्या जबाबात म्हटले. आता चांदिवाल आयोगाने पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी ठेवली आहे. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुखयांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या आरोपांसंदर्भात चौकशीसाठी राज्य सरकारकडून न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आयोगाला दिवाणी न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
संजिव गोयंका अन् राहुलमध्ये काय चर्चा झाली, लखनौच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
संजिव गोयंका अन् राहुलमध्ये काय चर्चा झाली, लखनौच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkoper Hording Collapsed : टॅक्सी, टेम्पो, कारचा चक्काचूर; दुर्घटनेनंतरची भीषण दृश्यChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 14 मे 2024 : ABP MajhaPM Modi Varanasi : मोदींनी वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा भरला  अर्ज : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
संजिव गोयंका अन् राहुलमध्ये काय चर्चा झाली, लखनौच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
संजिव गोयंका अन् राहुलमध्ये काय चर्चा झाली, लखनौच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Jackie Shroff High Court: अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
Rohit Pawar : राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
Kareena Kapoor Saif Ali Khan : करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,
करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,"सैफ हॅट्रिकच्या तयारीत"
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Embed widget