एक्स्प्लोर

Break The Chain | राज्यात कठोर निर्बंध लागू, मात्र लोकल प्रवेशासंदर्भात संभ्रम कायम

राज्यात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतरही लोकल ट्रेनमधल्या गर्दीमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. येत्या दोन दिवसात गर्दीचे निरीक्षण करुन मगच लोकलच्या फेऱ्या कमी करायच्या की तशाच ठेवायच्या याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. 

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर देखील लोकल ट्रेनमधल्या गर्दीमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. स्थानकात प्रवेशासाठी कोणतेही निर्बंध लावले गेलेले नाहीत. आधीच्या लॉकडाऊन प्रमाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेटिंग दिसून आली नाही. तिकीट खिडक्यांवर देखील सर्वांना टिकीट दिली जात आहे. तसेच आरपीएफ आणि जीआरपी देखील प्रवाशांचे आय कार्ड किंवा क्यू आर कोड तपासताना आढळून आले नाहीत. याचे कारण म्हणजे राज्य सरकारकडून रेल्वेला कोणत्याही प्रकारचे आदेश अजूनही प्राप्त झालेले नाहीत. 

राज्य सरकारने स्थानकात कोणाला प्रवेश घ्यावा आणि कोणाला देऊ नये या संदर्भातल्या लेखी आदेश रेल्वेला दिले नाहीत. तसेच यावेळी निर्बंध लावताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बैठकीला देखील बोलावले गेले नव्हते. त्यामुळे रेल्वे स्थानकात घेणाऱ्या प्रत्येकाला प्रवेश दिला जात आहे. तिकीट खिडक्यांवर देखील घेण्यासाठी आलेल्या सर्वांना तिकीट दिले जात आहे. 

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात गर्दीचे निरीक्षण करुन मगच लोकलच्या फेऱ्या कमी करायच्या की तशाच ठेवायच्या याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

राज्यात 15 दिवस संचारबंदी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बुधवारी म्हणजेच, काल रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. असून पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला 'ब्रेक द चेन' असं नाव देण्यात आलं आहे. आज ब्रेक द चेन (Break The Chain) या निर्बंधाचा पहिला दिवस आहे. पुढील 15 दिवस म्हणजे 1 मे पर्यंत राज्यात कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे विनाकारण कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. 

काय सुरु राहणार?
- राज्यात 144 कलम चालू, पुढचे 15 दिवस संचारबंदी.
- अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे.
- घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नये. 
- आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. 
- सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
- लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील.
- जनावराचे रुग्णालय सुरु राहतील.
- पावसाळी पूर्व कामं सर्व सुरु राहतील.
- अधिस्विकृती पत्रकारांना मुभा राहिल.
- हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील टेक अवे सुरुच राहतील.
- रस्त्यावरच्या ठेले वाल्यांनाही टेक अवेची घोषणा.

काय बंद राहणार? 
- प्रार्थना स्थळं, शाळा आणि कॉलेज, खाजगी कोचिंग क्लासेस, सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत बंद 
- रेस्टॉरंट्समध्ये बसून खाता येणार नाही. 
- अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयं बंद 
- कामाशिवाय फिरण्यास बंदी 
- सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद 
- धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सभांवर बंदी 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
Ganesh Festival 2026 MSRTC : गौरी-गणपतीसाठी एसटी महामंडळाचा मेगाप्लॅन, कोकणात एसटीच्या 5,220 जादा बसेस धावणार, प्रताप सरनाईक यांची माहिती
गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 5220 जादा बसेस धावणार, प्रताप सरनाईक यांची माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Embed widget