(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांविरोधात रेल्वेतही होणार कारवाई, विशेष मार्शल नेमणार
मुंबईत लोकल प्रवासात अनेक प्रवाशांकडून मास्क वापरला जात नसल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी मुंबई महापालिकेने कठोर पाऊलं उचलण्याचे ठरवले आहे. त्यासाठी लोकलमध्ये मार्शल नियुक्त केले जाणार आहे
मुंबई : मुंबईत कोरोना पुन्हा डोके वर काढण्याच्या मार्गावर आहे. मात्र कोरोनाला रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यात सर्ववसामान्यांसाठी लोकल सुरु झाल्यापासून रुग्णणसंख्येत वाढ होतांना समोर आलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून लोकल प्रवासात मास्कचा वापर न करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मार्शल नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लोकल प्रवास खुला झाल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात कोरोना संक्रमण वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्यास वेळीच आवर घालण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने नव्याने आढावा सुरू केला आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, टास्क फोर्सचे सदस्य आदींशी संवाद साधला. त्यात करोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपायांचा आढावा घेण्यात आला.पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना मास्क न वापरल्याने दंड
लोकलमध्ये मार्शल्सची नियुक्ती होणार
या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकल प्रवासात अनेक प्रवाशांकडून मास्क वापरला जात नसल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी मुंबई महापालिकेने कठोर पाऊलं उचलण्याचे ठरवले आहे. त्यासाठी लोकलमध्ये मार्शल नियुक्त केले जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी सांगितले की, एजन्सीच्या माध्यमातून प्रत्येक मार्गिकेवर 100 जणांची नियुक्ती केली जाणार आहे. ही कारवाई दोन दिवसांत सुरू होणार असून त्यात मास्क न वापरल्यास 200 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
WEB EXCLUSIVE | मुंबईकरांची मास्क न लावण्याची कारणं ऐकलीत का?
आतापर्यंत 30 कोटींचा दंड वसूल
मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांवर सुरुवातीपासूनच कडक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 15 लाख मुंबईकरांवर मास्क न वापरल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्ययाकडून 30 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.