Maharashtra Corona Update : मुंबईत आज एकही मृत्यू नाही तर सोलापुरात सर्वाधिक 6 मृत्यू, तुमच्या जिल्ह्याची स्थिती पहा
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1 हजार 715 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
![Maharashtra Corona Update : मुंबईत आज एकही मृत्यू नाही तर सोलापुरात सर्वाधिक 6 मृत्यू, तुमच्या जिल्ह्याची स्थिती पहा maharashtra corona cases patients 2680 discharged today 1715 new cases in the state today Maharashtra Corona Update : मुंबईत आज एकही मृत्यू नाही तर सोलापुरात सर्वाधिक 6 मृत्यू, तुमच्या जिल्ह्याची स्थिती पहा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/12/cf2c6cd5776e10d39453d1876635be44_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1 हजार 715 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 680 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 19 हजार 687 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.39 टक्के आहे. दरम्यान, राज्यात आज 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 28 हजार 631 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,27,084 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या मुंबईत 5030 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1214 दिवसांवर गेला आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 106 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुण्यात गेल्या 24 तासात 106 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 126 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 49,30,055 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या मुंबईत 1056 सक्रिय रुग्ण आहेत. यात 166 गंभीर रुग्ण असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
देशात कोरोनाबाधितांमध्ये घट; आठवड्यात दुसऱ्यांदा 15 हजारांहून कमी रुग्णांची नोंद
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid-19) आता मंदावतोय. आठवडाभरात दुसऱ्यांदा 15 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. रविवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 14,146 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 144 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तर 19788 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 40 लाख 67 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 52 हजार 124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 34 लाख 19 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाखांहून कमी झाली आहे. एकूण 1 लाख 95 हजार 846 रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)