एक्स्प्लोर

Maharashtra Budget | शेतकरी कर्जमाफीसाठी 22 हजार कोटी, पेट्रोल-डिझेल 1 रुपयाने महागणार

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानभवनात सादर केला. यावेळी शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारासाठी सरकारने कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. तर वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्ग, ग्रामीण विकासावरही सरकारचा भर असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. राज्यातील सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक मंदीचं सावट, कर्जमाफी योजना, महिला सुरक्षा आणि कोरोना व्हायरसवर उपायांच्या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारासाठी सरकारनं कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. तर वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्ग, ग्रामीण विकासावरही सरकारचा भर असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं. याशिवाय सरकारने इंधनावरील कर वाढवल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा दर एक रुपयांनी वाढणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी 22 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच दोन लाखाहून अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. अजित पवारांनी अर्थसंकल्पादरम्यान विविध कविता सादर करत, सभागृहातील वातावरण हलकं-फुलकं ठेवण्याचा प्रयत्न केला. तर अर्थसंकल्पाच्या शेवट सुरेश भटांची कविता सादर करुन केला. शेतकऱ्यांसाठी काय? - कर्जमाफीसाठी एकूण 22 हजार कोटी रुपयांचा निधी - शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचं काम सुरु - नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 रुपये प्रोत्साहनपर रक्कम - 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करणार - अल्पभूदारकांसाठीची योजना संपूर्ण राज्यात राबवणार - जलसंधारण योजनांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबवणार - शेती पंपासाठी नवी वीज जोडण्या देणार. - शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी पुढील 5 वर्षात 5 लाख सौरपंप योजना सुरु करणार पायाभूत सुविधा - कोकण सागरी महामार्गाला  3 वर्षात मूर्त स्वरुप देण्यासाठी 3500 कोटींची तरतूद - पुण्यात बाहेरु येणारी वाहतूक शहराबाहेर वळवण्यासाठी 170 किमी लांबीचा रिंग रोड बांधणार - समृद्धी महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती करणार रस्ते विकास - ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मोठी योजना हाती घेणार - योजनेअंतर्गत 40,000 किमी रस्त्यांचं बांधकाम - नागरी सडक विकास योजनेसाठी 1000 कोटींची तरतूद - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस ताफ्यातील जुन्या बस बदलून 1600 नवीन बस विकत घेणार आरोग्य - राज्यात 75 नवीन डायलिसिस केंद्र स्थापन करणार - नंदुरबार, सातारा, अलिबाग, अमरावती इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार शिक्षण  - पुढील चार वर्षात 1500 शाळांना आदर्श शाळा म्हणून नावारुपास आणणार, त्यासाठी 500 कोटींची तरतूद - रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त 11 कोटी रुपये. - शिक्षण विभागासाठी रुपये 2 हजार 525 कोटी, उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी रुपये 1300 कोटी अर्थसंकल्पाच्या नावाखाली जाहीर सभेचं भाषण : देवेंद्र फडणवीस आज अर्थसंकल्पाच्या नावाखाली जाहीर सभेचं भाषण झालं. या सरकारला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असल्याचा विसर पडला आहे. तर कोकणाच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले की, मागील वर्षीच्या ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स नव्हता. प्रचंड मोठी तूट वाढली आहे, यावर्षीही वाढणार आहे या सरकारला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असल्याचा विसर पडला आहे. कोकणाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मराठवाडा वॉटर ग्रीडला अपुरा निधी देण्यात आला आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या सिंचन योजनेचा उल्लेख नाही. 50 आणि 25 हजार हेक्टरी देऊ या घोषणेचा विसर पडला असून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना एक नवा पैसा मिळालेला नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. याशिवाय महाविकास आघाडी सरकारने आमच्याच शेतकरी कर्जमाफीच्या योजनेची पुनरावृत्ती केल्याचा दावा फडणवीस यांनी केला. तसंच 2 लाख 68 हजार कोटींची गुंतवणूक पायाभूत सुविधांवर आमच्या सरकारने केली होती अनेक घोषणा केंद्र सरकारच्या भरवशावर केल्याचं फडणवीस म्हणाले. अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे 80 टक्के स्थानिकांच्या रोजगारासाठी कायदा करणार उच्च तंत्रशिक्षणासाठी 1300 कोटी क्रीडा संकुलासाठी 25 कोटींचा निधी सर्व शाळांना इंटरनेटने जोडणार आरोग्य विभासाठी 5 हजार कोटी एसटीसाठी 1600 बस विकत घेणार राज्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी सरकारकडून शेतकऱ्यांना आधार अल्पभूदारकांसाठीची योजना संपूर्ण राज्यात राबवणार 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा कर्जमाफीसाठी एकूण 22 हजार कोटी रुपयांचा निधी क्रीडा संकुलासाटी 25 कोटींचा निधी मुंबईत मराठी भवन बांधणार रोज १ लाख शिवभोजन थाळी देणार वरळीत पर्यटन संकुल उभारणार आमदारांच्या विकासकांमांच्या निधीत वाढ
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget