एक्स्प्लोर
महाराष्ट्र बंद: विधानभवनाच्या गेटवर आमदार आबिटकरांचा ठिय्या
कोल्हापूरचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी मराठा मोर्चाने पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी, मुंबईत विधानभवनावर धडक मोर्चा काढला.
मुंबई: कोल्हापूरचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी मराठा मोर्चाने पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी, मुंबईत विधानभवनावर धडक मोर्चा काढला.
आमदार प्रकाश आबिटकर आज विधानभवनाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार होते. यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे परवानगी मागितली. मात्र सुरक्षा राक्षकांकडून त्यांना विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर अडवण्यात आलं.
त्यामुळे आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानभवन प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरु केलं. आमदार आबिटकर यांच्यासोबत भुदगरड प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद भोईटे आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. मात्र एकटे आमदार आबिटकर गेटवर आंदोलनाला मांडी घालून खाली बसले आहेत. अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी गाडीत बसवून ठेवलं.
फोटो : आमदार प्रकाश आबिटकर विधानभवनासमोर मांडी घालून बसले!
राज्यभरात आंदोलन, महाराष्ट्र बंद
गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. या बंदमध्ये मुंबईचा समावेश असला, तरी नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाज सहभागी होणार नाही. मराठा समाज समन्वयक आणि पोलिसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार नागरिकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगून नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा संघटनांनी बंदमधून माघार घेतली आहे. या ठिकाणी बंदऐवजी ठिय्या करुन निषेध नोंदवला जाणार आहे.
आजच्या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळं दूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहतील. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील काही शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुट्टीचा निर्णय मुख्याध्यापकांकडे सोपवला होता. यानुसार काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी हा निर्णय घेतला आहे..
मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यात मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यापैकी मेगा भरती स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement