Maharashtra Assembly session Live updates : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष, एमआयएम तटस्थ

Maharashtra Politics LIVE :राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून दोन दिवस होणार आहे. या अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Jul 2022 09:08 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Politics LIVE Updates : राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून दोन दिवस होणार आहे. या अधिवेशनात आज (3 जुलै) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी असणार आहे. शिवसेना...More

आजच्या भाजप आणि शिवसेना बंडखोर आमदारांच्या बैठकीत काय झालं ?

भाजप आणि शिवसेना बंडखोर आमदारांची ताज प्रेसिडेंट हॉटेलला रविवारी  बैठक पार पडली. या बैठकीत सोमवारी होणाऱ्या बहूमत चाचणी संधर्भात चर्चा व आमदारांना मार्गदर्शन करण्यात आले. सोमवारी बहुमत चाचणीत कोणतीही चुकू नये यावर  दोन्ही गटांच्या आमदारांना विशेष सूचना दिल्या गेल्या. 


या बैठकीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. आज विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सर्व आमदारांचे अभिनंदन ही या बैठकीत करण्यात आले.  तसेच उद्या ही बहुमत सिद्ध होईल असा विश्वास दोन्हीं गटाच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. यांनतर दोन्ही गटातील आमदारांनी एकत्रित भोजन केले.