एक्स्प्लोर

Maha Portal | महापोर्टल अखेर बंद, नव्या पोर्टलसाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात

सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया करणाऱ्या महापरीक्षा पोर्टलवर मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून अनेक गंभीर आक्षेप घेतले जात आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांचा रोष लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी देखील यात लक्ष घातलं होतं.

मुंबई : सरकारी नोकर भरतीसाठी फडणवीस सरकारच्या काळात सुरू असलेले महापोर्टल ठाकरे सरकारने अखेर बंद केलं आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सततच्या  तक्रारीनंतर आज हा मोठा निर्णय घेऊन नव्या पोर्टलसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलद्वारे (Maha pariksha portal) सरकारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याबाबतीतच्या त्रुटींमुळे परीक्षार्थींकडून वारंवार तक्रारी येत होत्या. त्याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आलं आहे.

महापोर्टल बंद व्हावे यासाठी अनेक जिल्ह्यात आंदोलन झाली तरी सुद्धा यावर निर्णय मात्र होत नव्हता. अनेक परीक्षांमध्ये महापोर्टल बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता मात्र, नव्या पोर्टलसाठी निविदा प्रक्रिया महाआयटीकडून राबवली जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची ही बातमी आहे.

महाआयटीकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने एका कंपनीची(पोर्टल) निवड महाआयटी करणार आहे. याआधी ज्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या त्याबाबतची माहिती महाआयटीकडून त्या त्या विभागाला हस्तांतरित केली जाणार आहे. त्यामुळे पुढची भरती प्रक्रिया देखील सुलभ होईल याची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे
मात्र, परीक्षा या ऑफलाइन होणार की ऑनलाइन ? याबाबत अद्याप या शासन निर्णयात स्पष्ट केलेलं नाही. शिवाय महापोर्टलबाबत कोणत्याही चौकशी बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, आता होणाऱ्या परीक्षा या त्या त्या विभागामार्फ़त नव्या पोर्टलच्या माध्यमातून घेतला जाणार आहे त्यामुळे गोंधळ या भरतीमध्ये होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी महाआयटी घेणार आहे.
महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याचा आणि त्या जागी एक पर्यायी व्यवस्था विभागीय स्तरावर आणण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. पण या भरती प्रक्रियेत एमपीएससी ला सामावून घेण्याची तसेच मागील काळात महापरीक्षा पोर्टलच्या वतीने झालेल्या भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारांच्या चौकशाची मागणी करतो, असं ट्वीट सत्यजित तांबे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Thane Crime Pradeep Purnekar: टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget