एक्स्प्लोर
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा, वर्षाला भाडे- 1 रुपया!
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. त्याबाबत राज्य सरकारने अध्यादेश जारी केला आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जी जागा देण्यात येणार आहे, त्यासाठी वर्षाला अवघा 1 रुपया भाडे आहे. 30 वर्षांसाठी हा भाडेकरार असेल.
स्मारकाबाबत जी ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे, त्यांना जागा हस्तांतरीत करण्याबाबत राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे.
दरम्यान, शिवसेनेचा राग निवळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नोटिफिकेशन काढल्याचं बोललं जात आहे. कारण कालच कॅबिनेट बैठकीत शिवसेनेने बुलेट ट्रेनला विरोध केला होता. तसंच संजय राठोड यांना यवतमाळच्या पालकमंत्रीपदावरून हटवल्यानेही सेनेने बैठकीतून काढता पाय घेतला होता.
त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने अध्यादेश जारी केला.
संबंधित बातम्या
बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यातच : मुख्यमंत्री
बाळासाहेब ठाकरेंचं यथोचित स्मारक उभारणार: मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement