एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदींच्या हस्ते मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018 चं उद्घाटन
मुंबईतील बीकेसीत सुरु असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

मुंबई : ''वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट ठेवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. हे उद्दीष्ट नक्की पूर्ण होईल, कारण महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे,'' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचं कौतुक केलं. मुंबईतील बीकेसीत सुरु असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, सुभाष देसाई, विनोद तावडे, उद्योजक रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह ग्लोबल बिझनेस लिडर्स मंचावर उपस्थित होते. फडणवीस सरकारच्या इज ऑप डुंईंग बिझनेसने महाराष्ट्राला गतीमान केलं. गेल्या वर्षी देशात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 51 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली. सध्या 2 लाख कोटींच्या गुंतवणुकीवर काम सुरु आहे. मेट्रोचं जाळं वाढत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘सबका साथ सबका विकास’साठी महाराष्ट्र केंद्र सरकारचं ट्रस्टेड पार्टनर : मुख्यमंत्री सबका साथ सबका विकास हे घोष वाक्य सत्यात उतरवण्यासाठी महाराष्ट्र केंद्र सरकारचं ट्रस्टेड पार्टनर असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली. ‘मेक इन महाराष्ट्र’च्या माध्यमातून 4.91 कोटींच्या गुंतवणुकीतून 61 टक्के करार पूर्णत्वास नेले, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे
- इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारताचा पहिला क्रमांक
- वर्षभरात 300 टक्क्यांनी FDI वाढला
- महाराष्ट्राला 2020 पर्यंत वन ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचा ध्यास
- 5 ते 10 वर्षात मटेरियल इकॉनॉमीची जागा डिजिटल इकॉनॉमी घेईल
- 24 लाख कृषी क्षेत्रातील स्किल्ड कामगारांना रोजगार देऊ
- 300 फिनटेक स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी धोरण तयार
- अवकाश आणि संरक्षण क्षेत्र, इ- व्हेईकल धोरण, एकात्मिक औद्योगिक धोरण तयार इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुकीत DEUTSCH बँकेने महाराष्ट्राला पहिला क्रमांक दिला
- नागपूर -मुंबई समृद्धी महामार्ग 24 जिल्ह्यांना JNPT पोर्टला जोडणार
- 25 इंटिग्रेटेड लॉजिस्टिक आणि टेक्सटाईल पार्क तयार करणार
- या कार्यक्रमाच्या माध्यमातून 10 लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे
- या कार्यक्रमात 4500 सामंजस्य करार होणार आहेत
- विविध क्षेत्रात 35 लाख रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
- अवकाश आणि संरक्षण उत्पादन, वस्त्रोद्योग, इ-व्हेईकल्स, खाद्यान्न प्रक्रिया आणि लघु व मध्यम उद्योग या क्षेत्रांवर विशेष भर
आणखी वाचा























