एक्स्प्लोर
'मॅग्नेटिक महाराष्ट्र'च्या आयोजनाची जबाबदारी पुन्हा 'विझक्राफ्ट'कडेच!
'मॅग्नेटिक महाराष्ट्र' हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात या कार्यक्रमाकडे मोठी आशेने पाहिले जात आहे.
मुंबई : दोन वर्षापूर्वी 'मेक इन इंडिया' या कार्यक्रमाच्या आयोजनात हलगर्जीपणा केलेल्या 'विझक्राफ्ट' या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीलाच राज्य सराकरच्या आगामी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी 'मेक इन इंडिया' कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याने आगीच्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी विझक्राफ्ट या कंपनीविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. तरीही आता त्याच कंपनीला कंत्राट दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 'फर्स्ट पोस्ट'ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
'मॅग्नेटिक महाराष्ट्र' हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात या कार्यक्रमाकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे. येत्या 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान हा कार्यक्रम मुंबईत आयोजित केला जाणार आहे. एमआयडीसी कार्यक्रमाची आयोजक, तर सीआयआय संस्था नॅशनल पार्टनर आहे.
'विझक्राफ्ट' या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने 14 फेब्रुवारी 2016 रोजी आयोजित 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी घेतली होती. गिरगाव चौपीटवर हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री, राज्यपाल, अनेक मंत्री, नेते आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योगपती उपस्थित होते. त्याचवेळी या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आगीची घटना घडली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र त्यानंतर विझक्राफ्ट या कंपनीवर बीएमसीसह मुंबई पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता.
असे सारे असतानाही, धक्कादायक म्हणजे कोणत्याही निविदेविना 'मेक इन इंडिया' किंवा 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' यांसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमाची जबाबदारी CII वर देण्यात आल्याचेही समोर आले आहे. याचे कारणही तेवढेच धक्कादायक आहे. उद्योग मंत्रालयाकडे वेळ नाही आणि CII ही प्रमाणिक संस्था आहे, असे या मंत्रालयाचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, 2016 सालच्या 'मेक इन इंडिया' या कार्यक्रमासाठी आयोजनाचं कंत्राट 13 कोटी 62 लाखांचं होतं. त्यातील 5 कोटी रुपये आधीच विझक्राफ्टला देण्यात आले होते. मात्र आगीच्या दुर्घटनेनंतर सरकारने उर्वरित रक्कम दिली नव्हती. मात्र काही दिवसांनंतर उर्वरित रक्कमही देण्यात आली.
'मॅग्नेटिक महाराष्ट्र'सारख्या इतका महत्त्वाचा कार्यक्रम, जिथे अनेक व्हीव्हीआयपी मंडळी हजर असणार आहेत, त्या कार्यक्रमाची जबाबदारी आधीच हलगर्जीपणा केलेल्या कंपनीकडे का दिली जाते, असा प्रश्न उपस्थित राहतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
पुणे
बीड
Advertisement