एक्स्प्लोर
ठाण्यात 'पेपर बॉम्ब' ड्रग्जचा विळखा, 15 लाखांचे अंमली पदार्थ जप्त
एकूण पाच किलो चरस आणि एलएसडी पेपर असं 15 लाखांचं ड्रग्ज जप्त करण्यात आल्याने ठाण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवहार होत असल्याचं अधोरेखित झालं आहे.
ठाणे : मुंबई-ठाण्यातील पालकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. 'पेपर बॉम्ब' हे कागदासारखं दिसणारं, पण अत्यंत घातक असं ड्रग्ज ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडलं आहे. एक ते दीड लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ हितेश मल्होत्रा या पेडलरकडून जप्त करण्यात आले आहेत, तर त्याच्या घरी एक किलो चरस पोलिसांना सापडलं आहे.
हितेश मल्होत्रासोबत मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शंकाही ठाणे क्राईम ब्रांचला आहे. यासोबत एका दुसऱ्या कारवाईत क्राईम ब्रांच युनिट वनने चार किलो चरस जप्त केलं आहे. एकूण पाच किलो चरस आणि एलएसडी पेपर असं 15 लाखांचं ड्रग्ज जप्त करण्यात आल्याने ठाण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवहार होत असल्याचं अधोरेखित झालं आहे. पोलिसांनी ठाण्यातील पालकांना आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याचं आवाहन केलं आहे.
काय आहे पेपर बॉम्ब?
पेपर बॉम्ब अर्थात एलएसडी पेपर. ड्रग्ज मार्केटमध्ये सर्वात आधुनिक आणि महाग म्हणून त्याची ओळख आहे. पिंक सुपर मॅन, ब्ल्यू - बॅटमॅन, ब्लॅक - स्पाईडरमॅन, आय - 25 अशा विविध कोडवर्डने ड्रग्ज मार्केटमध्ये एलएसडी पेपर ओळखला जातो. हे ड्रग्ज पावडर, टॅबलेट आणि लिक्वीड अशा तिन्ही प्रकारात उपलब्ध आहे. मात्र तरुणाईकडून या ड्रग्सच्या पेपर प्रकाराला जास्त मागणी असते.
या पेपरचा तुकडा जिभेवर ठेवताच तो हळूहळू विरघळू लागतो आणि नशा होते. त्यामुळे सुपरहिरो असल्याचा भास होऊन नशा करणाऱ्या व्यक्तीला आकाशात उंच भरारी घेऊ शकतो, किंवा समुद्रात कितीही किलोमीटर अंतर पोहून पार करु शकतो, असा आभास होतो. पेपर बॉम्ब या ड्रग्जने ब्राझील, ऑस्ट्रेलिया, युरोप या देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. परदेशात या ड्रग्जवर कडक निर्बंध असल्याने त्याने आता भारतात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
कोल्हापूर
सोलापूर
Advertisement