एक्स्प्लोर
ओरिजनल कागदपत्र, आधार कार्डच्या फॉर्मचा हायवेवर खच
नवी मुंबई: सायन-पनवेल हायवेवरील नवी मुंबईतल्या खारघरच्या हिरानंदानी पुलाखाली आधार कार्डसंदर्भातील कागदपत्रांचा खच आढळल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे यात काही मूळ कागदपत्रांसबोतच महत्त्वाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीही जोडलेल्या आहेत.
नवी मुंबईतील सायन-पानवेल हायवेवर असणाऱ्या खारघरच्या हिरानंदानी पुलापासून ते कोपर ब्रिजपर्यंत या आधारकार्डांचा खच पाहायला मिळाला. हे फॉर्म नेमके कुठून आले याची माहिती मिळत नसली, तरी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही सर्व कागदपत्र घाटकोपर, ठाणे, भिवंडी आणि कल्याण विभागातली असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे यामधील सर्वाधिक कागदपत्रे ही कळवा-मुंब्रा परिसरातील नागरिकांची असल्याचं पाहायला मिळत होते.
यासर्व कागदपत्रांमध्ये काही मूळ कागदपत्रांसोबतच महत्त्वांच्या कागदपत्रांचे झेरॉक्स जोडलेले होते. काही कागदपत्रांसोबत आमदार राम कदम आणि जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली शिफारसपत्रंही जोडलेली होती.
सध्या निवडणुकांचा काळ असल्याने ही सर्व कागदपत्रे ही सर्व कागदपत्रे मुंबईहून-पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सापडली. त्यामुळे इतक्या मोठ्या आधार कार्डांचे फॉर्म नेमके कुठे नेण्यात येत होते, याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, यातील काही कागदपत्रांचा खच पोलिसांनी गोळा पोलीस स्टेशनमध्ये जमा केला आहे.
यानंतर, आधारकार्ड काढण्याचे काम ज्या कंपनीने घेतले होते, ती NPHT pvt ltd कंपनी ठाण्यामधील एजन्सीकडून कागदपत्रे जमा करुन पेणमधील गोडाऊनमध्ये ठेवण्यासाठी टेंम्पोमधून घेऊन जात होती. यावेळी रात्री टॅम्पोतून दोन गोण्या सायन-पनवेल हायवेलगत पडल्याचा खुलासा कंपनीने केला आहे.
व्हिडिओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement