(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच महायुतीचा महामेळावा, फेब्रुवारीच्या अखेरीस महामेळाव्याचं आयोजन
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहा महसूल विभागामध्ये जाहीर मेळावे होणार आहे.
मुंबई : मुंबईत लवकर महायुतीचा (Mahayuti Melava) महामेळावा पार पडणार आहे. 14 जानेवारीला एकाच जिल्ह्यात 35 ठिकाणी महायुतीचे मेळावे होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीचा महामेळावा पार पडणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी महायुती कार्यकर्त्यांमध्ये महामेळाव्यातून ऊर्जा भरणार आहे.
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान किंवा वांद्रे बीकेसी येथे करण्याचे नियोजन सुरु आहे . फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस हा महामेळावा घ्यायचं महायुतीचे ठरले आहे . नुकतीच महायुतीतील सर्व घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यात जानेवारी महिन्यामध्ये राज्यात ठिकठिकाणी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय मेळाव्या आयोजित करण्यात आलेले आहेत. या 14 तारखेला एकाच जिल्ह्यात 35 ठिकाणी महायुतीचे मेळावे होणार आहेत. यात घटक पक्षाचे आणि महायुतीचे प्रमुख नेते हे आपल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहणार आहेत . त्यात हे सर्व मिळावे पार पडल्यानंतर मुंबईत एक महामेळावा करण्याचे महायुतीने ठरवलं आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहा महसूल विभागामध्ये जाहीर मेळावे होणार आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जाहीर मेळावे
भाजप (BJP) आणि महायुतीतील (Mahayuti) मित्रपक्ष कामाला लागले आहेत. 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेण्यात येणार आहे. जिल्हा, तालुका आणि बूथ पातळीवर मेळावे होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांचे जाहीर मेळावे होणार आहे. घटक पक्षाचे नेते देखील या मेळाव्याला हजर असणार आहेत. 14 तारीखपासून आम्ही मेळावे आयोजित केले. सहा प्रादेशिक विभागात आम्ही मेळावे आयोजित केले आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही जाहीर मेळावे होणार आहे.
महायुतीच्य जागावाटपाची चर्चा
महायुतीचे जागावाटप रखडले आहे. महायुतीच्य जागावाटपाची चर्चा सध्या सुरू आहे. जागा वाटपाबाबत रोज नवनवीन दावे करण्यात येत आहेत. कोणाला किती व कोणत्या जागा मिळतील याबाबत तर्क लढवले जात आहेत. जागा वाटपाचा फार्म्युला अद्याप ठरला नसला तरी अधुनमधून सगळ्याच पक्षांचे नेते जागांवर दावे-प्रतिदावे करत आहेत. महायुतीचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी नेते दिल्लीला देखील जाणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा :
लोकसभेपूर्वी भाजपचा 'मेगाप्लान'; भाजपच्या आमदारांना अयोध्येत नागरिकांना नेण्यासाठी टार्गेट, 'राम दर्शन विशेष ट्रेन' सुरू करण्याचा विचार