मुंबईकरांनो घराबाहेर पडताय? मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पाहा सविस्तर
Mumbai Local Megablock: मुंबईत आज मध्य (Central Railway) आणि हार्बर मार्गावर (Harbour Railway) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
Mumbai Local Megablock: मुंबईत आज मध्य (Central Railway) आणि हार्बर मार्गावर (Harbour Railway) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रेल्वेकडून ब्लॉक (Mega Block) घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड मार्गावर अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 03.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचेल.
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत
(बेलापूर/नेरुळ - खारकोपर मार्ग वगळून)
पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि
ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.
ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.
मुंबईत पावसाची स्थिती काय ?
मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसानं धुमशान घातलं होतं. मुंबईत जोरदार पाऊस बरसत होता. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईसह उपनगरात पावसाचा इशारा वर्तवण्यात आलाय. पालघर, ठाण्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. मुंबईसाठी आज यलो अलर्ट दिलाय. मुंबईत मध्यरात्री पावसाचा जोर वाढू शकतो असं आयएमडीच्या वैज्ञानिकांनी सांगितलंय.