एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाण्यात अंगावर झाड पडून वकीलाचा मृत्यू
अंगावर झाड पडून मुंबईत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असतानाच, ठाण्यातही अंगावर झाड पडून एका वकीलाचा मृत्यू झाला आहे. किशोर पवार असं या वकिलाचं नाव आहे.
ठाणे : अंगावर झाड पडून मुंबईत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असतानाच, ठाण्यातही अंगावर झाड पडून एका वकीलाचा मृत्यू झाला आहे. किशोर पवार असं या वकीलाचं नाव आहे.
ठाण्यातल्या पाचपखाडी परिसरातील उदयनगरमध्ये सोसायटीतील शुक्रवारी झाड पडल्यानं दुचाकीवरुन जाणारे किशोर पवार गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं. यात त्याच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली होती. पण काल संध्याकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दुसरीकडे मुंबईतल्या चेंबूर भागात शनिवारी मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचं झाड पडल्यामुळे दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमुळे महापालिकांचा हालगर्जीपणावर ताशेरे ओढले जात आहेत.
दरम्यान, रहिवासी भागातील झाड अचानक कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे यासाठी महापालिकेसोबतच बिल्डरही जबाबदार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
संबंधित बातम्या
मुंबई पालिकेच्या हलगर्जीमुळे दूरदर्शनच्या माजी निवेदिकेचा बळी?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement