एक्स्प्लोर

Lalbaugcha Raja 2021 : यंदा विराजमान होणार लालबागचा राजा; पाद्यपूजन सोहळा संपन्न

Lalbaugcha Raja 2021 : लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे अत्यंत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

Lalbaugcha Raja 2021 : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवर साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. अशातच यंदा मात्र लालबागचा राजा विराजमान होणार असल्याची माहिती मंडळानं काही दिवसांपूर्वी दिली होती. गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळं लालबागचा राजा सर्वजनिक गणेशोत्सव मंडळने 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता. यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशातच आज लालबागच्या राजाचा पाद्यपुजन सोहळा पार पडला. 

लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा आपलं 88 वा गणेशोत्सव सोहळा साजरा करणार आहे. यंदा मंडळातर्फे शुक्रवार म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 ते रविवार 19 सप्टेंबर 2021 या कालावधीत साजरा होणार आहे. आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी ठिक सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खऱ्या अर्थानं लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे. 

जगभरातील गणेशभक्तांचं अराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज पहाटे सहा वाजता पार पडला. कोरोना संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा सोहळा पार पडला. लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं हा सोहळा जाहीरपणे न करता, काही मर्यादित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केला. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली. दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. यंदा मात्र कोरोना निर्बंधांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती. 

यंदा विराजमान होणार लालबागचा राजा 

यंदा राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मूर्तीच्या उंचीबाबत जे निर्बंध जे नियम शासनाने घालून दिली आहे त्याचे सुद्धा काटेकोरपणे पालन मंडळाकडून केले जाईल.  लालबाग राजाच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांना हे दर्शन ऑनलाइन घेता येईल यासाठी सुद्धा मंडळा कडून तयारी केली जाणार आहे.

लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव  सुधीर साळवी यांनी सांगितलं की,  खरंच लाखो भाविक लालबागच्या राजाची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी कारण काल झालेल्या मंडळाच्या बैठकीत यावर्षी लालबागचा राजा विराजमान होणार आहे.  भाविकांना ऑनलाइन दर्शन ,ऑनलाइन प्रसादाची सुविधा सुविधा केली जाणार आहे.त्यामुळे येथे कुठेही गर्दी होणार नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Atul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिलाABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaMamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Embed widget