एक्स्प्लोर
मुंबईत रेल्वे स्टेशनवर गर्दुल्याचा तरुणीवर चाकूहल्ला
![मुंबईत रेल्वे स्टेशनवर गर्दुल्याचा तरुणीवर चाकूहल्ला Lady Injured By Drug Addict At Dadar Station मुंबईत रेल्वे स्टेशनवर गर्दुल्याचा तरुणीवर चाकूहल्ला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/18022414/Local_Attack-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या 23 वर्षीय तरुणीवर एका गर्दुल्ल्याने चाकूने हल्ला केला. रविवारी रात्री ही घटना घटना घडली.
फिरोज युसुफ शेख असं हल्लेखोराचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
पुजा बाळकृष्ण पाखरे ही तरुणी दादर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 1 वर रात्री 8.27 च्या लोकलची वाट पाहत उभी होती. मात्र त्याचवेळी एका गर्दुल्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पुष्पाला मानेला दुखापत झाली आहे. तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांनी हल्लेखोर गर्दुल्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान, रेल्वे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा लोकलमध्ये महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)