एक्स्प्लोर

'मला धमकी दिली', लोकलमध्ये मारहाण झालेल्या महिलेचा आरोप

'त्यांनी माझी बॅग फेकून दिली, माझा ड्रेस फाडला, मला ओरबाडलं आणि धमकी दिली की, परत इथं यायचं नाही. ही आमची गाडी आहे.'

कल्याण : लोकलमध्ये जागेसाठी गुंडगिरी करणाऱ्या मुजोर महिलांन आज कल्याण स्थानकात जीआरपी पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं. या महिलांवर तक्रारकर्त्या महिलेनं गंभीर आरोप केले आहेत. काल (बुधवार) डोंबिवलीमध्ये लोकलमध्ये चढलेल्या या महिलेला काही महिला प्रवाशांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी लोकलच्या डब्यांमध्ये घुसून कोम्बिंग ऑपरेशन करत 15 ते 20 महिलांना आज अटक केली. महिलेचा नेमका आरोप काय? डोंबिवलीच्या या महिलेला काल कल्याण-सीएसएमटी ट्रेनमध्ये काही महिलांकडून मारहाण करण्यात आली. 'मी डब्यात चढल्यानंतर या महिला मला म्हणाल्या की, आमची गाडी आहे यायचं नाही. उद्या इथं आलं तर खबरदार... त्यानंतर त्यानी मला गलिच्छ आणि घाणेरड्या शिव्याही दिल्या. नंतर त्यांनी माझी बॅग फेकून दिली, माझा ड्रेस फाडला, मला ओरबाडलं आणि धमकी दिली की, परत इथं यायचं नाही. ही आमची गाडी आहे.' असा आरोप मारहाण झालेल्या महिलेनं केला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी 8.30च्या सुमारास मुबंईकडे जाणाऱ्या एक लोकलमध्ये महिला प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून हाणामारीची घटना घडली. कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये डोंबिवलीमधून बसून डाऊन-अप जाण्यासाठी (डोंबिली-कल्याण-मुबंई असा प्रवास करण्यासाठी) आधीच जागा अडवल्याचा राग आल्याने कल्याण स्थानकातील महिलांनी एका महिलेला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवलीच्या चारुशीला वेल्हाळ या महिला रेल्वे प्रवाशाला कल्याणच्या महिलांनी मारहाण करत जागा सोडण्यासाठी धक्काबुकी केली. त्याची तक्रार रेल्वे पोलिसात करण्यात आली होती. डोंबिवली स्थानकातून सकाळी 8.21ला कल्याणासाठी ही लोकल डाऊनच्या दिशेने धावते. कल्याण स्थानकावरुन हीच लोकल सकाळी 8.36ला सीएसटीसाठी निघते. पण बुधवारी ही लोकल 10 मिनिटं उशिराने पोहोचल्याने गोंधळ झाला. लोकल खचाखच भरून आल्याने कल्याणच्या महिला संतापल्या आणि त्यांनी डोंबिवलीवरुन बसून आलेल्या महिलांना धक्काबुक्की आणि मारहाण सुरु केली. कल्याण रेल्वे स्थानकात आणि बदलापूर मध्ये अशा घटना सातत्याने होत असल्याचं वारंवार निदर्शसनास आलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कल्याणहून अंबरनाथला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. चौथ्या सीटवर बसण्याच्या वादातून एका प्रवाशाचा तिघांशी वाद झाला होता. यावेळी त्याला ट्रेनमध्येच बेदम मारहाण करण्यात आली होती. VIDEO : संबंधित बातम्या : लोकलमध्ये गुंडगिरी करणाऱ्या 15 ते 20 महिलांना सापळा रचून पकडलं!

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget