एक्स्प्लोर
Advertisement
अनिकेतच्या हत्येची SIT चौकशी करा, कोथळे कुटुंबीय हायकोर्टात
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सांगलीच्या पोलीस उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी कोथळे कुटुंबियांना तो पळून गेल्याची माहीती दिली होती. त्यामुळे संपूर्ण घटनेची माहिती असतानाही चुकीची माहीती देऊन दिपाली काळे यांनी आरोपींची मदत केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
मुंबई : अनिकेत कोथळे हत्याकांडाला जबाबदार म्हणून पोलीस उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांना सहआरोपी करा, अशी मागणी करणारी याचिका कोथळे कुटुंबियांनी हायकोर्टात दाखल केली आहे. तसेच, संपूर्ण घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सांगली शहर पोलिसांच्या कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत संपूर्ण हत्याकांडाला जबाबदार म्हणून पोलीस उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांना सहआरोपी करा, तसेच संपूर्ण घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करा, या दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणं अपेक्षित आहे.
या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे याचा जबाब सीआयडीमार्फत मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवून घेण्यात आला आहे. सांगली शहर पोलिसांनी 6 नोव्हेंबर रोजी अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती.
पोलीस कोठडीत झालेल्या बेदम मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिसांनी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंबोली इथ नेऊन जाळला आणि अनिकेत पोलीस कोठडीतून पळून गेल्याचा बनाव रचला. मात्र प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह 5 जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली.
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सांगलीच्या पोलीस उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी कोथळे कुटुंबियांना तो पळून गेल्याची माहीती दिली होती. त्यामुळे संपूर्ण घटनेची माहिती असतानाही चुकीची माहीती देऊन दिपाली काळे यांनी आरोपींची मदत केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement