Kishori Pednekar VIDEO : अमित ठाकरे हे आक्रमक नाहीत, तो त्यांचा उद्धटपणा; किशोरी पेडणेकरांची टीका
अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्याला किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोक आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यामध्ये तुलना करत असल्याचं त्या म्हणाल्या.
मुंबई : आक्रमकपणा वेगळा असतो आणि उद्धटपणा वेगळा असतो, अमित ठाकरे आक्रमक नाहीत तर तो त्यांचा उद्धटपणा असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. अमित ठाकरेंनी त्यांच्या भाषणात काका उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर किशोरी पेडणेकरांनी त्याला प्रत्युत्तर दिलं.
राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरल केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "2019 ची निवडणूक जेव्हा लागली होती तेव्हा राज ठाकरे यांच्या घरी अमित ठाकरे आजारी होते. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी सुद्धा अनेकदा त्यांची चौकशी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सख्खे मावसभाऊ, सख्खे चुलत भाऊ आहेत. पण त्यांचे संस्कार तुमच्या पर्यंतच आहेत का? अमित ठाकरेंपर्यंत आले नाहीत का?"
आदित्य ठाकरे यांनी आतापर्यंत राज ठाकरेंवर कुठल्याही प्रकारे टीका किंवा चुकीचे शब्द वापरले नाहीत असं सांगत किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "अमित ठाकरे ज्याप्रकारे डायलॉग करतात, ते लोक ऐकत आहे. माझे काका कोणत्या स्वभावाचे आहेत हे अमित ठाकरे सांगतात. अमित ठाकरे यांना आक्रमक म्हणत नाहीत तर उद्धट म्हणतात. याला उद्धटपणा म्हणतात. तुम्ही निवडणूक लढत आहात. तुमच्याच कुटुंबामध्ये आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंमध्ये लोक तुलना करत आहेत."
आता आदित्य ठाकरेंची माहीममध्ये सभा आहे. आता तुम्ही रण छेडलच आहे तर बघू आपण उद्याची स्थिती. माहीमच्या विषयावर आदित्य ठाकरे बोलतील. पण आदित्य ठाकरे यांनी कधीही संयमाची पातळी सोडली नाही असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
उद्धव ठाकरे यांची बॅग चेक करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका करण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, फारच अराजक माजते का हे हे तपासलं पाहिजे. पण ते उद्धव ठाकरे यांनाच का लागू होतं? या आधी फडणवीसांचीही बॅग चेक करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले. पण त्या ठिकाणचे लोक खोटं बोलत आहेत. उद्धव ठाकरेंची बॅग चेक करत असतानाही त्यांनी त्या अधिकाऱ्यांसोबतसुद्धा माणुसकीचे दर्शन दाखवलं.
ही बातमी वाचा: