एक्स्प्लोर

माफियांशी समझोत्याची चर्चा शक्य नाही, सोमय्यांचा घणाघात

मुंबई : माफियांशी समझौत्याची चर्चा होऊ शकत नाही. महापालिकेत माफियाबंदी स्वीकारावी लागणार आहे, असा घणाघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर युतीबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसताना शिवसेना-भाजपमध्ये तू-तू-मै-मै सुरुच आहे. 'माफियांशी समझौत्याची चर्चा होऊ शकत नाही. महापालिकेत माफियाबंदी स्वीकारावी लागणार आहे. राहता राहिला प्रश्न जाहीरनाम्याचा, तर शिवसेनेने आतापर्यंत काय केलं? महापालिकेतील गेल्या 22 वर्षांचा हिशोब द्यावा', अशी मागणी सोमय्यांनी केली. शिवसेना आणि सेना नेत्यांची नोटाबंदीमुळे नाकाबंदी झाली आहे, त्यामुळे त्यांची अडचण समजू शकतो, अशी टीकाही किरीट सोमय्या यांनी केली. भाजप हा मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्र, देशात एक नंबरचा पक्ष आहे. कोणी मित्रपक्ष आमच्याबरोबर येत असेल तर त्यांना किती जागा द्यायच्या हा एक मुद्दा आहे. मात्र आम्ही कुणाकडे भीक मागत नाही तो काळ आता गेला, असा टोलाही किरीट सोमय्यांनी लगावली.

मालमत्ता करमुक्तीची घोषणा आमची : आशिष शेलार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 500 चौरस फुटांपर्यंतची घरं मालमत्ता करमुक्त करण्याची घोषणा केली खरी, मात्र ही मागणी आपली असल्याचा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. मी आमदार म्हणून राज्य सरकारकडे ही मागणी केली होती. तसेच तिला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. आता भाजपच्या जाहीरनाम्यात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होईपर्यंत रस्ते टॅक्स घ्यायचा नाही अशी भूमिका आम्ही घेतली आहे, असं शेलार यांनी सांगितलं. रस्ते टॅक्समधून महापालिकेला 500 ते 600 कोटी मिळतात, पण रस्त्यांची अवस्था तशीच असते. त्यामुळे महापालिकेच्या ‘टॅक्स टेररिझम’मधून मुंबईकरांना सुटका मिळावी, ही आमची भूमिका आहे. यानंतर आता काही जणांना उपरती होत आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. सध्या महापालिका रस्ते टॅक्स आकारते. एकूण करापैकी साधारण 13 टक्के कर हा रस्ते टॅक्स मधून येतो. त्यामुळे जोपर्यंत रस्ते खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत रस्ते टॅक्स आकारणार नाही, असा भाजपचा मानस आहे. तसेच जोपर्यंत मुंबईकरांना चोवीस तास पाणी मिळत नाही तोपर्यंत पाणी पट्टी आकाराली जाणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री महोदय, जेन झीनं स्क्रीनवर नसायला पाहिजे आणि मैदानांवर असावं पण तुम्ही मैदानं ठेवताय कुठे? : आदित्य ठाकरे
मुंबई गेल्या चार वर्षात बदलली, 17 मैदानांचं आरक्षण बदललं, मैदानं वाचवण्यासाठी एकत्र यावं लागेल : आदित्य ठाकरे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget