एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कीर्ती व्यास हत्या प्रकरणी खुशी शाजवानीचा जामीन नामंजूर
एका प्रतिष्ठीत सलून मध्ये काम करणाऱ्या कीर्ती व्यास हिने तिचा सहकारी असलेल्या सिद्धेश ताम्हणकर याला कामावरुन हटकल्यामुळे सिद्धेशने आपली सहकारी खुशी हिच्या मदतीने कीर्तीचा काटा काढला. त्यानंतर तिचा मृतदेह वडाळा येथील खाडीत फेकून दिला. मे 2018 मध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडले.
मुंबई : सलूनमध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकारी महिलेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली आरोपी खुशी शाजवानी हिला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. कीर्ती व्यास हत्याप्रकरणात आरोपी सहभागी असल्याचे सबळ पुरावे असल्याने न्यायालयाने खुशी शाजवानी हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
एका प्रतिष्ठीत सलून मध्ये काम करणाऱ्या कीर्ती व्यास हिने तिचा सहकारी असलेल्या सिद्धेश ताम्हणकर याला कामावरुन हटकल्यामुळे सिद्धेशने आपली सहकारी खुशी हिच्या मदतीने कीर्तीचा काटा काढला. त्यानंतर तिचा मृतदेह वडाळा येथील खाडीत फेकून दिला. मे 2018 मध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडले.
सत्र न्यायालयाने खुशीचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर तिने आपल्या सुटकेसाठी हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध करत कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून खुशी हिचा प्रत्यक्ष हत्तेत सहभाग असल्याचे हायकोर्टाला पटवून दिले. सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरत हायकोर्टानं आरोपीची याचिका फेटाळून लावली.
28 वर्षीय तरुण, 42 वर्षीय विवाहितेच्या प्रेमसंबंधातून कीर्तीचा बळी
सिद्धेश शांताराम ताम्हणकर आणि खुशी शाजवानी या दोघांनी जे कृत्य केलं आहे, ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. सिद्धेशच्या कामाबाबत असमाधान व्यक्त करत एचआर असलेल्या कीर्ती व्यासने त्याला नोटीस दिली होती. कामात सुधारणा झाली नाही, तर त्याला कामावरुन काढून टाकण्याचा इशारा दिला होता. याच गोष्टीचा राग मनात धरत 16 मार्च रोजी सिद्धेश आणि खुशी या दोघांनी कीर्तीचं अपहरण केलं. गाडीतच तिची हत्या केली आणि त्यानंतर वडाळ्यातल्या नाल्यामध्ये तिचा मृतदेह फेकून दिला, असा दोघांवर आरोप आहे.
सिद्धेश ताम्हणकरचं मुंबईतील भोईवाड्यात घर आहे. त्याला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. सिद्धेशचं शिक्षण बीकॉमपर्यंत झालं असून तो अंधेरीतल्या बीब्लंट सलूनमध्ये अकाऊंटन्ट म्हणून नोकरी करत होता. त्याचा महिन्याचा पगार हा 25 हजारांच्या आसपास होता. या घृणास्पद कृत्यातलं दुसरं नाव होतं ते म्हणजे खुशी सहज्वानी. 42 वर्षांची खुशी विवाहित आहे. तिला दहावीत शिकणारा एक मुलगा आहे. खुशीच्या पतीचा ट्रॅव्हल्सचा बिझनेस असून सांताक्रूजमधल्या उच्चभ्रू इमारतीत ती राहते. बीब्लंट सलूनमध्ये ती प्रशिक्षण विभागात काम करत होती. तिला जवळपास 60 हजारांच्या घरात पगार होता
खुशी आणि सिद्धेश यांच्यात प्रेमसंबंध होते. पण कीर्तीने बजावलेल्या नोटिशीमुळे सिद्धांतची नोकरी जाण्याची वेळ आली होती. आता कुठे प्रेमाची गाडी रुळावर येत असताना नोकरी जाण्याची चिंता आणि विरहाच्या भीतीने या दोघांनी एक भयंकर प्लॅन आखला आणि त्यात कीर्तीचा बळी गेला.
कीर्ती ग्रँट रोडमधील भारत नगर परिसरात राहत होती. ती 16 मार्चला सकाळी घराबाहेर पडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कीर्ती 8 वाजून 50 मिनिटांनी बिल्डिंगबाहेर पडताना दिसते. त्यानंतर सिद्धेश आणि खुशी यांनी तिला लिफ्ट दिली होती. कीर्तीला ग्रँट रोड स्टेशनजवळ असलेल्या नवजीवन सोसायटीजवळ सोडल्याचा दावा दोघांनी सुरुवातीला केला होता.
कीर्तीच्या आईने सकाळी 11 वाजताच्या सुमारास तिला फोन केला होता, मात्र संपर्क होऊ शकला नव्हता. रात्रीपर्यंत कीर्ती घरी न आल्यामुळे तिच्या पालकांनी डी बी मार्ग पोलिसात तक्रार दाखल केली होती. नवजीवन सोसायटीजवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कीर्ती गाडीतून उतरलेली दिसत नव्हती. तेव्हापासून कीर्तीचा ठावठिकाणा लागत नव्हता. तिचा फोनही स्वीच्ड ऑफ होता. शिवाय गेल्या सहा वर्षांत कधीच कुठला सहकारी कीर्तीला पिक अप करण्यासाठी न आल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला होता.
कीर्ती काम करत असेललं बीब्लंट सॅलॉन अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरची घटस्फोटित पत्नी अधुनाच्या मालकीचं आहे. कीर्ती बेपत्ता झाल्यानंतर फरहाननेही कीर्तीला शोधण्यासाठी ट्विटरवरुन आवाहन केलं होतं. खरं तर कोणत्याही कॉर्पोरेट बिझनेसमध्ये कर्मचाऱ्यांकडून त्यांचे टार्गेट्स पूर्ण करण्याची अपेक्षा असते. पण प्रेमामध्ये मश्गुल असलेल्या या जोडप्याने कामाकडे तर दुर्लक्ष केलंच, पण एका साध्या आणि गुणी पोरीचं आयुष्य संपवलं.
संबंधित बातम्या
28 वर्षीय तरुण, 42 वर्षीय विवाहितेच्या प्रेमसंबंधातून कीर्तीचा बळी
मुंबईतील कीर्ती व्यासच्या हत्येचं गूढ उकललं, सहकाऱ्यांकडून हत्या
दीड महिन्यापासून बेपत्ता मुंबईकर तरुणीची हत्या?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement