Karuna Sharma : औरंगजेबाने त्याच्या पत्नीला तुरुंगात टाकले नव्हते; मुंडे अन् गँग त्याच्यापेक्षाही क्रूर, करूणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर घणाघात, म्हणाल्या आणखी पुरावे...
Karuna Sharma : करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कठोर शब्दात टीका करत धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर वृत्तीचे आहेत.

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच होते, असा निर्वाळा मुंबईतल्या माझगाव कोर्टानं दिला आहे. कोर्टानं शनिवारी दिलेल्या आदेशाची प्रत एबीपी माझाच्या हाती लागली आहे. दोन मुलांना जन्म देणं हे एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असं कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे करुणा शर्मा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळायला पात्र असल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असंही कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. धनंजय मुंडेंची याचिका फेटाळात कोर्टानं करुणा शर्मांना दोन लाखांची पोटगी देण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. दरम्यान, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कठोर शब्दात टीका करत धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर वृत्तीचे आहेत. औरंगजेबाने आपल्या बायका-पोरांचे कधीही हाल केले नाहीत, असं करुणा मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.
न्यायालयाने दिलेला न्याय खूप चांगला
एबीपी माझाशी बोलताना करुणा शर्मी म्हणाल्या, मी न्यायाधिशांचे आभार मानते, त्यांनी सुनावणीवेळी हे लग्न झालं असल्याचं म्हटलं आहे. त्यापुढे त्यांनी आणखी एक गोष्ट नमूद केली आहे, ती म्हणजे एखाद्या आमदार, मंत्र्याच्या पत्नीला त्याच लिव्हिंग स्टँडर्स्डमध्ये राहण्याचा पूर्ण अधिकार असून त्यांना हा खर्च करावा लागणार आहे. न्यायालयाने दिलेला न्याय खूप चांगला आहे, न्यायालयाने मला दिलेल्या न्यायामुळे मी संतृष्ट आहे, असंही करुणा मुंडे यांनी पुढं म्हटलं आहे.
निवडणुकीच्या वेळी मी माझा मंगळसूत्र गहाण ठेवलेले
'मागील २७ वर्ष जो संघर्षाचा काळ होता, त्यावेळी पासूनचा माझ्या नवऱ्याचा संघर्ष काळ होता. तो संघर्ष पूर्ण झाला आहे. ज्यावेळी धनंजय मुंडे आणि मी भेटलो होतो, त्यावेळी आम्ही दोघंही विद्यार्थी होतो, तेव्हाच्या विद्यार्थीपासून ते आताच्या मंत्रीपदापर्यंत पोहोचण्यापर्यंत जो संघर्ष आम्ही दोघांनी केला आहे, मी माझी प्रॉपर्टी विकली, आणखी खूप काही, मंगळसूत्र दोन वेळा गहाण ठेवलं होतं, निवडणुकीच्या वेळी मी माझा मंगळसूत्र गहाण ठेवलेले होते. तो सर्व संघर्ष आम्ही दोघांनी सोबत पार केला आहे. पण मंत्री झाल्यानंतर तुम्ही ऐष, मौज करता, त्यासाठी तुम्ही दुसऱ्या बाजारू महिलांना ठेवता, हे सर्व मी पुराव्यासहित माध्यमांना देणार आहे, मी गप्प बसणार नाही. माझ्यासोबत झालेलं आहे विकृत आहे ते ज्याप्रमाणे संतोष देशमुख हत्या प्रकरण क्रूर वृत्तीने झालं, तसंच क्रूर वृत्ती माझ्यासोबत झाली आहे', असंही पुढे करूणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
औरंगजेब देखील यांच्यापेक्षा फिका पडेल
'सर्व गोष्टी मी कोर्टात दिलेल्या नाहीत, इतर सर्व गोष्टी न्यायाधिशांनी पाहिलेल्या नाहीयेत. जसं-जसं केस पुढे जाईल, तसे तसे मी सर्व पुरावे उघड करणार आहे. माझ्या बहिणीचे व्हिडिओ, माझ्या आईची आत्महत्या, मी 2008 मध्ये स्वत: विष प्राशन केलं होतं, पाच दिवस मी नोव्हेंबर 2008 मध्ये रुग्णालयात भरती झाले होती. या सर्व गोष्टींसोबत माझ्यावर दोन खोट्या केस करुन मला जेलमध्ये टाकलं. 45 दिवस येरवडा सारख्या जेलमध्ये ठेवलं. हे अतिशय क्रूर होतं. नीच पेक्षा पण नीच कृत्य, संपूर्ण भारतात कोण इतकं नसेत तितकं, औरंगजेब देखील यांच्यापेक्षा फिका पडेल, इतक्या नीच वृत्तीचे हे लोक आहेत. औरंगजेबनेही आपल्या पत्नीला जेलमध्ये टाकलं नसेल. माझा 27 वर्षांचा प्रवास क्रूर वृत्तीचा होता. आपल्या मुला-बाळांचं तोंड बघून गप्प राहिले. आमच्या घरगुती हिंसाचारामध्ये जे - जे लोक आहेत, त्या सर्वांना शिक्षा होणार आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहे. केवळ धनंजय मुंडे नाही, तर सर्व गुंड गँगला जेल होणार आहे', असा विश्वास करुणा शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
आमदार झाल्यानंतर माझं मुंबईमध्ये येणं-जाणं
तर मी न्यायालयाची खूप खूप आभारी आहे. धनंजय मुंडे यांनी काय काय नमूद केलं होतं, एक खोटं बोलण्याची हद्द असते पण, त्यांनी खोटेपणाची हद्द पार केली आहे. त्यांच्या डोक्यात इतका खोटेपणा कोण भरतंय त्यांनाच माहिती. मला कळत नाही. माझ्याकडे पुरावे आहेत धनंजय मुंडेंनी त्यामध्ये काय लिहलं आहे ते मी आमदार झाल्यानंतर माझं मुंबईमध्ये येणं-जाणं सुरू झालं आणि त्यानंतर आम्ही भेटलो आणि लिव्ह इनमध्ये असताना आमची दोन मुलं-बाळं झाली. जून 2003 ची कागदपत्रे आहेत. घर खरेदी केल्याची माझ्या करूणा धनंजय मुंडे या नावावरती पहिल्यांदा घर खरेदी केलं होतं. जून 2003 मध्ये त्यांच्याकडे आमदारकी नव्हती, ते खोटं बोलत आहेत, त्या सगळ्याचे पुरावे मला द्यायचे आहेत, असंही पुढे करूणा शर्मा यांनी म्हटलं आहे.























