एक्स्प्लोर

लोकलमधून नाल्यात पडला, 'असंवेदनशीलतेत' बुडून तरुणाचा मृत्यू

लोकांपैकी कुणीही पुढे येऊन या युवकाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, उलट आपापल्या मोबाईलमध्ये त्याचं चित्रीकरण करण्यात धन्यता मानली.

कल्याण : धावत्या लोकलमधून नाल्यात पडलेल्या तरुणाला वाचवण्याऐवजी बघ्यांनी त्याचं चित्रीकरण करण्यात धन्यता मानली आणि या तरुणाचा सर्वांदेखत बुडून मृत्यू झाला. कल्याणमध्ये घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये माणुसकी उरली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोमवार सकाळी 11.30 ची वेळ... कल्याणच्या शहाड भागात एका नाल्याशेजारी स्थानिकांची अचानक गर्दी झाली. काय झालं हे पाहण्यासाठी अनेक जण आपापल्या गाड्या थांबवून नाल्याशेजारी धावले. यावेळी नाल्यात एक युवक बुडत असल्याचं लोकांना दिसलं. या लोकांपैकी कुणीही पुढे येऊन या युवकाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, उलट आपापल्या मोबाईलमध्ये त्याचं चित्रीकरण करण्यात धन्यता मानली. एक तरुण नाल्यात उतरला, पण तोवर खूप उशीर झाला होता. या तरुणाचा सर्वांदेखत बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ पुढे आला, आणि असंवेदनशीलतेनं किती कळस गाठला आहे, हे समोर आलं. सर्वांदेखत हा युवक बुडत असताना एकाने तरी त्याला वाचवायला पुढे यायला हवं होतं, पण तसं झालं नाही. कल्याणसारख्या शहरात घडलेल्या या प्रकाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या फॅडमुळे माणसा-माणसातला संवाद तर कमी झाला आहेच, पण आता संवेदनशीलताही संपू लागल्याचं या धक्कादायक प्रकारानं समोर आलं. लोकलमधून पडलेल्या या युवकाचं वय अवघं वीस वर्षांचं असून तो क्लास किंवा कॉलेजहून परतत असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय तो लोकलमधून नाल्यात पडला, त्यावेळी त्याच्यासोबत आणखी एक तरुणही होता, मात्र तो किरकोळ जखमी झाल्यानं उठून पळून गेल्याचं सांगितलं जातं. या दोघांचा तोल जाऊन ते पडले, की गाडीत टीसी आला आणि त्याला घाबरुन दोघांनी उडी मारली? हे कळायला मार्ग नाही. कारण मृत तरुणाची अजूनही ओळख पटलेली नाहीये. त्याची ओळख पटल्यानंतरच या सगळ्या गोष्टींचा उलगडा होऊ शकणार आहे. या सगळ्या घटनेनंतर खरोखर माणुसकी हरवत चालली आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण एखाद्या जखमीला वाचवण्याऐवजी सोशल मीडियाच्या नादापायी त्याचे फोटो काढणं, हा माणुसकीचा धर्म नक्कीच नाही. एखाद्याचा जीव गेल्यानंतर तरी लोकांना शहाणपण येईल का, हा प्रश्नच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget