एक्स्प्लोर
कल्याणच्या मुरबाडमध्ये बँकेचं एटीएम लुटणारा गजाआड
मुरबाडजवळच्या शिवळे गावात 'बँक ऑफ महाराष्ट्र'ची शाखा असून 24 ऑक्टोबर रोजी चोरट्याने बँकेचं दार तोडून आत प्रवेश केला.
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये 'बँक ऑफ महाराष्ट्र'चं एटीएम लुटणारा चोर गजाआड झाला आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.
मुरबाडजवळच्या शिवळे गावात 'बँक ऑफ महाराष्ट्र'ची शाखा असून 24 ऑक्टोबर रोजी चोरट्याने बँकेचं दार तोडून आत प्रवेश केला. यानंतर एका कार्डाच्या साहाय्याने त्याने एटीएममधून 1 लाख 10 हजार रुपये चोरले. मात्र यावेळी तो सीसीटीव्हीत कैद झाला.
याच धाग्यावरुन ग्रामीण पोलिसांनी तपास करत नरेश मोरे या चोरट्याला बेड्या ठोकल्या. नरेश मूळचा मुरबाड तालुक्यातल्याच कळंभाड गावात राहणारा असून पोलिस सध्या अधिक तपास करत आहेत.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement