एक्स्प्लोर
बीएमसी दुटप्पीपणा करतेय, बिग बीने सेटिंग केली का? उद्योगपती के. व्ही सत्यमूर्ती यांचा सवाल
आम्हाला दोघांना वेगळा न्याय का? बीग बीने सेटिंग केली असेल, असा आरोपही सत्यमूर्ती यांनी केला आहे. सत्यमूर्ती यांचे बांधकाम तोडल्यानंतर आता बीएमसी अमिताभ बच्चन यांच्या अतिक्रमणावर कारवाई करते का? याकडे लक्ष लागून आहे.
मुंबई : जुहूतील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगतच्या बंगल्यांची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आज बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला आणि शेजारच्या सत्यमूर्ती रेसिडेन्सीच्या आवारातील आठ ते नऊ फूट जागा मुंबई महापालिका ताब्यात घेणार आहे. यासाठी आज पालिकेने उद्योजक सत्यमूर्ती यांच्या बंगल्याच्या कंपाउंडची भिंत तोडली.
यावरून वातावरण चांगलेच तापले असून सत्यमूर्ती यांनी महापालिका आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केले आहेत. बीएमसी बीग बीच्या घरांवर हातोडा मारणार का? असा सवाल करत बीएमसी दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप सत्यमूर्ती यांनी केला आहे.
बीग बीची भिंत तोडायला बीएमसी घाबरत आहे. आम्हाला दोघांना वेगळा न्याय का? बीग बीने सेटिंग केली असेल, असा आरोपही सत्यमूर्ती यांनी केला आहे. सत्यमूर्ती यांच्या बंगल्याचं कंपाउंड तोडल्यानंतर आता बीएमसी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर कारवाई करते का? याकडे लक्ष लागून आहे.
जुहूतील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगतच्या बंगल्यांची जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. जुहूतील या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महापालिकेने 45 फुटांच्या संत ज्ञानेश्वर मार्गाचे 60 फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी जंक्शनवरील के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या सत्यमूर्ती रेसिडन्सी आणि अमिताभ बच्चन यांच्या 'प्रतीक्षा' बंगल्याच्या आवारातील काही जागेची आवश्यकता असल्याचे महापालिकेचं म्हणणं आहे.
जागा घेण्याबाबात महापालिकेने या दोघांनाही नोटीस पाठवली होती. परंतु अमिताभ बच्चन यांच्याकडून या नोटीसचं कोणतंही उत्तर अद्याप आलेलं नाही. तर नोटीस मिळताच के व्ही सत्यमूर्ती यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयानेही स्थगितीचा आदेश दिला नाही. त्यामुळे आता महापालिकेने सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या आवारातील जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
VIDEO | अमिताभ यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या 'दिवार'वर महापालिकेचा हातोडा? | स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बातम्या
बीड
पुणे
Advertisement