एक्स्प्लोर

क्रिकेटचा देव आणि तबल्याचा बादशाह एकाच मंचावर

मुंबई : एक जगविख्यात तबलावादक तर दुसरा क्रिकेटच्या मैदानावरचा सम्राट... एकाचे हात तबल्यावर थिरकतात, तर दुसऱ्याच्या हातात बॅट तळपते. उस्ताद झाकीर हुसेन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर... आपापल्या क्षेत्रातले हे महारथी एकाच मंचावर आले.. दोघांची जुगलबंदी रंगली आणि उपस्थित प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. सावनी सूर संगम यांनी आयोजित केलेल्या 'जर्नी ऑफ एक्सलन्स' या कार्यक्रमात झाकीर हुसैन यांच्या जादुई बोटांनी नेहमीप्रमाणे तबल्याचा ताबा घेतला आणि शेजारी बसलेला मास्टरब्लास्टरही भारावून गेला. नंतर दोघांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. सचिन आणि संगीत यांचं नातं कसं आहे? सचिन : बऱ्याचशा क्रिकेटर्सप्रमाणे मलाही म्युझिक आवडतं. एखादा खेळाडू तणावाखाली असेल, तर संगीत ऐकल्याने त्याला शांतता मिळते. टीम इंडियाची ड्रेसिंग रुमने नेहमीच संगीताने भारलेली असते. आम्ही बॉलिवूड गाण्यांपासून पंजाबी संगीतापर्यंत सर्व प्रकारच्या गाण्यांवर ठेका धरायचो. अगदी पाश्चात्य संगीतसुद्धा! आमच्या क्रिकेटच्या प्रवासात म्युझिक हा कायमच मूक साथीदार राहिला आहे. संगीतकार आणि खेळाडू यांच्यात कशाप्रकारे साधर्म्य आहे? सचिन : आपली पॅशन जपणं आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेणं हे खेळाडू आणि संगीतकारांमधलं मुख्य साम्य आहे, असं मला वाटतं. प्रेक्षक आणि चाहत्यांवर आमचा खोलवर प्रभाव असतो. तुम्ही आतापर्यंत काय अचिव्ह केलंय, याने तितकासा फरक पडत नाही. प्रत्येक परफॉर्मन्स किंवा मॅच ही नवी सुरुवात असते. संगीत असो की खेळ, वेळ आली की षटकार किंवा षड्ज ठोकावाच लागतो. तू भारतीय शास्त्रीय संगीत ऐकतोस का ? सचिन : प्रामाणिकपणे सांगायचं तर मी फारसं क्लासिकल म्युझिक ऐकलेलं नाही. मला राग किंवा सूर कदाचित समजणारही नाहीत. पण मला खात्री आहे, की मी चांगला रसिक आहे. उस्ताद झाकीर जी यांच्याशी बंध कसे जुळले? सचिन : उस्तादजी क्रिकेटचे चाहते आहेत आणि मी म्युझिकचा दिवाना. माझ्या एका मित्राने माझा फोटो उस्तादजींना दिला आणि त्यांनी स्वतःचा स्पेशल फोटो स्वाक्षरी ठोकून मला पाठवला होता. 2011 मध्ये विश्वचषकाच्या वेळी आमची ही देवाणघेवाण झाली. आम्हाला एकमेकांची व्यक्तिशः भेट घेण्याची खूप तीव्र इच्छा होती. मात्र जवळपास पाच वर्ष हा योग काही जुळून आला नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आमच्या एका मित्राने भेट घडवून आणली. तीन तास आमच्या गप्पा रंगल्या आणि तेव्हाच असा एखादा कार्यक्रम करण्याची संकल्पना आमच्या डोक्यात रुजली. या कार्यक्रमातून आम्हाला काय मिळणार? सचिन : 'जर्नी ऑफ एक्सलन्स'बद्दल आम्ही गप्पा मारणार आहोत. आमचे अनुभव शेअर करत दिलखुलास उत्तरं देण्याचा आमचा प्रयत्न असेल. उस्तादजींचे परफॉर्मन्स ऐकण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.00 AM : 05 JULY  2024Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....
वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Embed widget