Job Majha : जॉब माझामध्ये आज आपण भारतीय क्रीडा प्राधिकरण, संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर आणि NPCIL (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.) मध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
भारतीय क्रीडा प्राधिकरण
पोस्ट – असिस्टंट कोच
एकूण जागा – 220
शैक्षणिक पात्रता - SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक/आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त.
वयोमर्यादा – 40 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट – sports authority of india.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर latest updates मध्ये jobs वर क्लिक करा. तिथे तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2021
NPCIL (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. )
पोस्ट - अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
एकूण जागा – 107 (फिटरसाठी 30, टर्नर 4, मशीनिस्ट 4, इलेक्ट्रिशियन 30, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 30, वेल्डर 4, COPA 5 जागा आहेत)
शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेडमध्ये ITI
वयोमर्यादा – 24 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण – रावतभटा, राजस्थान
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2021
जर तुम्हाला पोस्टाने अर्ज पाठवयाचा असेल तर शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2021
अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता - HR Officer Nuclear Training Centre, Rawatbhata Rajasthan Site NPCIL, P.O.-Anushakti, Via-Kota (Rajasthan), Pin- 323303.
अधिकृत वेबसाईट - www.npcil.nic.in
संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर
पोस्ट - प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
एकूण जागा – 64
नोकरीचं ठिकाण – कोल्हापूर
अधिकृत वेबसाईट - www.sanjayghodawatuniversity.ac.in
अर्ज पाठवण्याचा पत्ता - रजिस्ट्रार, संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर- सांगली हायवे, ता.- हातकणंगले, जि. कोल्हापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021
इतर बातम्या