Jayant Patil on Badlapur Encounter : शाळेची चौकशी थांबविण्यासाठी अक्षय शिंदेला यमसदनी धाडले? जयंत पाटलांचे खळबळजनक वक्तव्य
बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आहे.
Badlapur Rape Accused Akshay Shinde Encounter : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आहे. पोलिसांशी झालेल्या चकमकीत अक्षय शिंदेला गोळी लागली. ट्रान्झिट रिमांडवर नेत असताना त्याला गोळी लागली आणि अक्षयला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपी अक्षय व्यतिरिक्त एका पोलीस कर्मचाऱ्यालाही गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बदलापूर आरोपीने स्वतःला गोळी मारून घेत आत्महत्या केली. मात्र यात शाळेची पुढील चौकशी थांबविण्यासाठी हे केलेले असावे, यात बाकीचे वाचतील म्हणून यालाच यमसदनी पाठवले असावे अशी शंका वाटते, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.
ऑगस्ट महिन्यात बदलापूर येथील शाळेत दोन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा सफाई कामगार होता. मुलींच्या पालकांच्या तक्रारीनंतरही शाळेने तातडीने कारवाई केली नाही आणि पोलिसांनीही सुरुवातीला हलगर्जीपणा दाखवला. मात्र, लोकांनी निदर्शने करून मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर प्रकरण आणखी वाढले.
गोळी कशी लागली?
अक्षयला गोळी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही? ट्रान्झिट रिमांडवर नेत असताना आरोपींनी व्हॅनमधील पोलिसाची बंदूक हिसकावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. यावेळी त्यांच्यासोबत एका पोलिसालाही गोळी लागली असून दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी आरोपींनी पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर तीन राऊंड गोळीबार केल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. प्रत्युत्तर पोलिसांनीही गोळीबार केला आणि आरोपीला गोळी लागली.
हे ही वाचा -
Badlapur Encounter पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल