एक्स्प्लोर

'ब्लू व्हेल'ने पुन्हा डोकं वर काढलंय? मुंबईत 13 वर्षीय मुलाची आत्महत्या

वडाळ्यातील भक्तीपार्कमध्ये 13 वर्षांच्या मुलाने 18 मजली इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (गुरुवारी) घडली.

मुंबई : वडाळ्यातील भक्तीपार्कमध्ये 13 वर्षांच्या मुलाने 18 मजली इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (गुरुवारी) घडली. आयमॅक्स थिएटरजवळील गिरनार टॉवरमध्ये ही घटना घडली. रियान चक्रवर्ती असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याच इमारतीत 16 व्या मजल्यावर त्याच्या आई वडिलांसह तो राहत होता. दुपारी ट्युशनवरून घरी आल्यानंतर तो थेट इमारतीच्या टेरेस वर गेला आणि तिथून खाली उडी मारली. रियानचे वडील शेअर मार्केटमध्ये, तर आई बँकेत नोकरीला आहे. रियान अभ्यासात आणि खेळात चांगला होता. रियानच्या मित्रांनी सांगितले की, त्याच्या आयुष्यात कोणतीही समस्या नव्हती, तो कोणत्याही तणावात नव्हता, त्यामुळे तो कधी आत्महत्या करेल, असे वाटलेदेखील नाही. तरिदेखील मग रियानने आत्महत्या का केली असेल? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. रियानच्याच वयाच्या शेकडो मुलांनी गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये BLUE WHALE CHALLENGE या गेममुळे आत्महत्या केली होती. रियाननेदेखील या गेममुळेच आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. ब्लू व्हेल गेमची मास्टरमाईंड 17 वर्षीय मुलगी अटकेत BLUE WHALE या रशियातून उदयास आलेल्या या गेममध्ये खेळणारा आणि त्याचा अदृश्य मार्गदर्शक यांच्यात अजाणतेपणी एक दृढ नातं निर्माण होतं. ठराविक टप्यानंतर खेळणाऱ्याला त्याचा मार्गदर्शक एक-एक काम सांगत जातो. पुढच्या टप्यावर पोहचण्यासाठी ते काम पूर्ण करून त्याचा पुरावा देणं खेळणा-याला बंधनकारक असतं. आणि या खेळात शेवटच्या टप्यावर खेळणाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातं. ब्लू व्हेल गेमचा मुलांवर कसा परिणाम होतो? मानसोपचारतज्ज्ञांची माहिती  गेल्या वर्षभरात या खेळाच्या काही घटना मुंबईसह देशभरात घडल्याच्या बातम्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या होत्या. केंद्र सरकारनंही हा ऑनलाईन गेम देशभरात ब्लॉक करण्याचे निर्देश दिले. परंतु इंटरनेटवर एखाद्या गोष्टीला संपूर्णपणे तात्काळ बंद करणं हे तितकसं सोपं राहिलेलं नाही. काय आहे 'ब्ल्यू व्हेल' गेम? ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये एक 'मास्टर' मिळतो मास्टर प्लेअरला कठीण टास्क देतो. स्वत:च्या रक्ताने ब्ल्यू व्हेल तयार करणं, शरीरावर जखमा करणे, दिवसभर हॉरर फिल्म पाहणे, रात्रभर जागणे अशा प्रकारचे टास्क मिळाल्यामुळं खेळणारे नैराश्याच्या गर्तेत जातात अशा प्रकारे मास्टर प्लेअरवर 50 दिवस कंट्रोल ठेवतो. खेळाचा शेवटचा टप्पा म्हणजे प्लेअरला आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं आणि स्वतःची हिंमत सिद्ध करण्यासाठी अनेक प्लेअर आत्महत्या करतात. 'ब्लू व्हेल गेम'मुळे 14 वर्षीय मुलाची इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या हातावर F57 लिहावं लागतं गेम खेळणाऱ्याला दररोज एक कोड नंबर दिला जातो. यामध्ये हातावर ब्लेडने F57 लिहावं लागतं. ते लिहून फोटो अपलोड करावा लागतो. या गेमचा अॅडमिन स्काईपवरुन गेम खेळणाऱ्याच्या संपर्कात असतो. जो शेवटच्या दिवशी आत्महत्या करतो, त्यालाच विजेता घोषित केलं जातं. संबंधित बातम्या ब्लू व्हेल गेमची मास्टर माईंड सापडली, 17 वर्षीय मुलीला बेड्या  ब्ल्यू व्हेल गेमच्या 22 वर्षीय मास्टरमाईंडची धक्कादायक माहिती ‘ब्लू व्हेल’ गेमच्या नादापायी मुंबईतील 14 वर्षीय मुलाची आत्महत्या जीवघेण्या ‘ब्लू व्हेल’ गेममुळे 130 मुलांची आत्महत्या? ब्लू व्हेल गेम विधानसभेत, अजित पवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget