एक्स्प्लोर
Advertisement
शिवसैनिकांची बंडाळी मोडीत, किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी
मुंबई : शिवसैनिकांची बंडाळी मोडून शिवसेनेने विद्यमान नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिली आहे. वॉर्ड क्रमांक 199 मधून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर
किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्यास स्थानिक शिवसैनिक, शाखाप्रमुखांचा विरोध होता. शिवसेना नेते राजेश कुसळे यांच्या पत्नी रुपाली कुसळे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी केली होती.
पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो मानेन अशी भूमिका किशोरी पेडणेकर यांनी घेतली होती. परंतु शिवसैनिक आणि शाखाप्रमुखांचा विरोध डावलून वॉर्ड क्रमांक 199 (सातरस्ता-डिलाईलरोड-ऑर्थर) रोड इथून किशोरी पेडणेकरांना उमेदवारी दिली.
मी महापालिका निवडणूक लढवणार नाही : शुभा राऊळ
दरम्यान, किशोरी पेडणेकर यांना एबी फॉर्म दिला असून त्या उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
छत्रपती संभाजी नगर
आयपीएल
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets