एक्स्प्लोर

India Lock Down | विरारमध्ये पायी जाणाऱ्या मजुरांना टेम्पोची धडक; चौघांचा मृत्यू, तीन जखमी

कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. सर्वच प्रवासी साधने बंद असल्याने लोकांनी पायी घरी जाण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरुन पायी जाणाऱ्या मजुरांना टेम्पोने जोरदार धडक दिली.

विरार : लॉकडाऊनमुळे प्रवासी साधने बंद असल्याने पायी प्रवास करुन घरी जाणाऱ्या सात मजुरांचा विरारमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्वच प्रवासी साधने बंद असल्याने लोकांनी पायी घरी जाण्यास सुरुवात केली आहे. वसईमध्ये कामानिमित्त असलेले हे सात जण आपल्या घरी म्हणजे गुजरातला जात होते. परंतु संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे, गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आलं होतं. वसईच्या दिशेने परत येत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीतील भारोल परिसरात एका भरधाव आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली.

सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाल्या रस्त्यांमध्ये अडकलेल्या मजुरांची सोय करा

या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले असून त्यामधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील दोघांची ओळख पटली असून पाच जणांची ओळख अद्याप समजलेली नाही. ओळख पटलेल्यांपैकी एकाचं नाव कल्पेश जोशी (वय 32 वर्ष) तर दुसऱ्याचं नाव मयांक भट (वय 34 वर्ष) आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनंतर संपूर्ण देशातील प्रवासी साधनांची वाहतूकही बंद झाली. परंतु तरीही काही जण जीव धोक्यात घालून मिळेल त्या वाहनाने प्रवास करत असल्याचे व्हिडीओ समोर आले. काही जण ट्रकच्या मागे लटकून प्रवास करताना दिसले. तर काही जण एका ट्रकमध्ये अक्षरश: दाटीवाटीने, कोंबून प्रवास करत होते. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिथे आहात, तिथेच राहणं गरजेचं आहे. कारण पुढील काही दिवस राज्यासाठी कसोटीचे असल्याचं त्यांनी सांगितलं. तरीही लोक असा जीवघेणार प्रवास करत आहेत.

Coronavirus Outbreak | लॉकडाऊनमुळे मजूर आणि विद्यार्थ्यांवर पायी प्रवास करण्याची वेळ

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget