एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयकर विभागाच्या चीनी कंपन्यांच्या कार्यालयात धाडी
या कारवाईत असे दिसून आले आहे की, चिनी व्यक्तींच्या आदेशानुसार, विविध डमी संस्थांमध्ये 40 हून अधिक बँक खाती तयार केली गेली आणि त्या काळात 1000 कोटींपेक्षा जास्त जमा झाली आहे.
मुंबई : बनावट कंपन्यांच्या साखळीतील काही चिनी व्यक्ती आणि त्यांचे भारतीय साथीदार मनी लाँड्रिंग आणि हवाला व्यवहारात गुंतल्याची केंद्रीय अर्थमंत्रालयाला माहिती मिळाली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीच्या आधारे आयकर विभागाकडून या चिनी कंपन्या, त्यांचे निकटवर्तीय आणि काही बँक कर्मचारी यांच्यावर देशात वेगवेगळ्या ठिकाणांवर धाडी टाकत शोध कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत असे दिसून आले आहे की, चिनी व्यक्तींच्या आदेशानुसार, विविध डमी संस्थांमध्ये 40 हून अधिक बँक खाती तयार केली गेली आणि त्या काळात 1000 कोटींपेक्षा जास्त जमा झाली आहे.
माहितीनुसार चिनी कंपनीच्या सहाय्यक कंपनीने आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी भारतात किरकोळ शोरूमचे व्यवसाय सुरू करण्यासाठी शेल संस्थांकडून 100 कोटी रुपयांचे बोगस व्यवहार केले आहेत.
या धाडीत हवाला व्यवहार आणि बँक कर्मचारी आणि चार्टर्ड अकाऊंटंट्सच्या सक्रिय सहभागासह पैशांची लँडिंग यासंदर्भात गुन्हेगारीची कागदपत्रे सापडली आहेत. हाँगकाँग आणि अमेरिकन डॉलर्सच्या विदेशी हवाला व्यवहारांचे पुरावेही सापडले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती आहे.
सीबीडीटीचं काय म्हणणं?
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं या संदर्भात निवेदन देत म्हटलं आहे की, शेल एजन्सीच्या साखळीव्दारे काही चिनी व्यक्ती आणि त्यांचे भारतीय सहकारी मनी लाँड्रिंग आणि हवाला व्यवहारात सामील होते. त्या माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली गेली. सर्च अॅक्शनमध्ये असे दिसून आले आहे की, चिनी व्यक्तींच्या आदेशानुसार, विविध बोगस संस्थामध्ये 40हून अधिक बँक खाती तयार केली गेली आणि त्या कालावधीत एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त जमा झाली आहे. चिनी कंपनीची सहाय्यक कंपनी आणि त्यासंबंधित लोकांनी भारतात किरकोळ शोरूमचे व्यवसाय उघडण्यासाठी बोगस संस्थांकडून 1000 कोटी रुपयांच्या बोगस अॅडव्हान्स घेतल्या आहेत. हवाला व्यवहार आणि बँक कर्मचारी आणि चार्टर्ड अकाऊंटंट्सच्या मदतीने पैशांची लँडिंग या संदर्भातील गुन्हेगारीची कागदपत्रे सापडली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement