एक्स्प्लोर
मुंबईत पुन्हा एक महत्वाचा पूल बंद, वाहनधारकांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना
आता हा पूल बंद केल्याने वाहनधारकांना टिळकनगर कॉलनीतून वाहनांना जावं लागणार आहे. तर विद्याविहार येथून जाणाऱ्या वाहनांना घाटकोपर माहुल रोड वरून लांब फेरा मारून जावं लागणार आहे.

मुंबई : मुंबईत पुन्हा एक पुलबंदी करण्यात आली आहे. विद्याविहार ते लोकमान्य टिळक टर्मिनस जाणारा पाईपलाईन रोड आज संध्याकाळपासून बंद करण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांना पुन्हा वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे.
चेंबूर सांताक्रुझ लिंक रोडवर जाणारी आणि येणारी तसेच लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणाऱ्या वाहनधारकांना हा पूल बंद केल्याने लांबून फेरा मारून जावं लागतं आहे. या ठिकाणी असलेल्या नाल्यावरील पूल कमकुवत झाला आहे, असा पालिकेच्या विभागाला अहवाल आला आहे.
त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. आधीपासूनच घाटकोपर पूर्वेला असलेल्या बेस्ट डेपोजवळील लक्ष्मी नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने घाटकोपर ते चेंबूर दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. आता पाईपलाईनवरील हा रस्ता बंद केल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडणार आहे.
आता हा पूल बंद केल्याने वाहनधारकांना टिळकनगर कॉलनीतून वाहनांना जावं लागणार आहे. तर विद्याविहार येथून जाणाऱ्या वाहनांना घाटकोपर माहुल रोड वरून लांब फेरा मारून जावं लागणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























