एक्स्प्लोर

निवडणुका असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला : मनसे

सध्या देशामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. इथे होणाऱ्या प्रचार सभांना मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातून जे लोक तिथे गेले आहेत, त्याच्यावर निर्बंध घालावेत, अशी भूमिका मनसेने मांडली आहे. 

मुंबई : निवडणुका असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला, अशी मागणी मनसेने केली आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूमधून येणारे नागरिक सुपर स्प्रेडर ठरु शकतात, असं मतही मनसेने मांडलं आहे. राजकीय सभांमध्ये होणाऱ्या गर्दीवर बोट ठेवत मनसेने ही मागणी केली आहे. 

मनसे नेते बाळा नांदगावरकर यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारल्याने येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकता. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे.

सध्या देशामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. इथे होणाऱ्या प्रचार सभांना मोठी गर्दी होत आहे. जर हे नागरिक महाराष्ट्रात आले तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लक्षणविरहीत रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे निवडणुका असलेल्या राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध लावावेत, क्वॉरन्टीनचा कालावधी असो चाचणी याबाबत कठोर नियमावली लागू करावी. त्यामुळे निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातून जे लोक तिथे गेले आहेत, त्याच्यावर निर्बंध घालावेत, अशी भूमिका मनसेने मांडली आहे. 

परप्रांतातून येणारे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीसाठी जबाबदार : राज ठाकरे
याआधी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गासाठी परप्रांतीय जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरे म्हणाले होते की, "कोरोना फक्त महाराष्ट्रातच का दिसतो? त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. बाहेरुन येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका, शेतकऱ्यांचे मोर्चे सुरु आहेत, तिकडे कोरोना, किंवा लाटा नाहीत. हे महाराष्ट्रातच सर्व सुरु आहे. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोना असल्याचं चित्र आहे. त्याचं एक कारण म्हणजे बाहेरुन येणाऱ्यांची संख्या आणि दुसरं म्हणजे तिकडे कोरोनाचे पेशंट मोजले जात नाहीत, त्यामुळे ते आकडे समोर येत नाहीत. तिथे मोजले तर असेच आकडे समोर येतील."

महत्त्वाच्या बातम्या

सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
Embed widget