एक्स्प्लोर

युती न झाल्यास शिवसेनेला जास्त फटका बसेल: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुस्थान टाईम्स या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना-भाजप युतीबाबतचं भाष्य केलं.

मुंबई: ‘एबीपी माझा’ने ‘देशाचा मूड’ या सर्वेक्षणात वर्तवलेल्या अंदाजावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. जर लोकसभेला शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढली तर त्याचा फटका दोन्ही पक्षांना होऊन, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फायदा होईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. हिंदुस्थान टाईम्स या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतचं भाष्य केलं. एबीपी माझाने ‘देशाचा मूड’मध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात यूपीए (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) एकत्र लढल्यास आणि शिवसेना स्वतंत्र लढल्यास, लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी यूपीएला 30, एनडीए अर्थात भाजप आणि शिवसेना सोडून अन्य मित्रपक्षांना – 16 जागा आणि शिवसेनेला केवळ 2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. महाराष्ट्रात यूपीए (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) एकत्र लढल्यास आणि एनडीए (भाजप आणि शिवसेना) एकत्र लढल्यास - लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी एनडीए - 36 यूपीए – 12 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. हिंदुस्थान टाईम्सच्या मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले, “जर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढत असेल आणि शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा फटका आम्हा दोघांनाही (भाजप-शिवसेना) बसेल. मतांचं विभाजन होईल. त्यामुळे विरोधी पक्षांना त्याचा फायदा होईल. आम्हाला फटका बसेलच पण शिवसेनेला जास्त फटका बसेल. त्यामुळे युती करुन निवडणुकीला सामोरं जाणं फायद्याचं ठरेल. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. जर आम्ही स्वतंत्र लढलो तर आमच्या 3-4 जागा इकडे-तिकडे कमी होतील. पण सध्याच्या घडीला देशपातळीवर युती टिकवणं आवश्यक आहे. शिवसेना आमचा जुना मित्र आहे, आमची विचारधारा सारखी आहे. त्यामुळे युती गरजेची आहे” स्वतंत्र लढण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेला कसं मनवणार? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “राजकीय परिस्थिती लोकांना त्या त्या वेळी पटवून देत असते. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी मायावतींच्या बसपाला संपवायला निघाली होती. तेच भविष्यात एकत्र येतील याचा कुणी विचार केला होता का? बिहारमध्येही तसंच घडलं. त्यापेक्षा मोठं उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबतची आघाडी तोडून त्यांच्याविरोधातच निवडणूक लढवली. पण निकालानंतर काँग्रेससोबत आघाडी करुन ते सत्तेत एकत्र आले. त्यामुळे राजकारण आणि राजकीय स्थिती बदलत असते. आमच्याबाबतही तेच होईल. संबंधित बातम्या  देशाचा मूड : काय आहे देशाचा मूड?   मूड देशाचा : आता निवडणुका झाल्यास भाजपला मोठा धक्का?  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवसे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवसे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हातीAnandache Paan : अनुवादक प्रफुल्ल शिलेदार आणि लेखक हृषिकेश पाळंदे यांच्याशी खास गप्पाDhangar Samaj on CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घालू, धनगर समाजाचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवसे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवसे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं विधान
Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी मोसमात प्रथमच पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदी मोसमात प्रथमच पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली
Embed widget