एक्स्प्लोर

Corona Vaccine | गरिबांना मोफत लस देण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रह धरणार : राजेश टोपे

Corona Vaccine : दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. येत्या 8 जानेवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन होणार असल्याचं टोपे म्हणाले.महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचे एकूण आठ रुग्ण असल्याची माहिती राजेशे टोपे यांनी दिली.

मुंबई : दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना कोरोना लस मोफत मिळालीच पाहिजे असा आग्रह राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धरला आहे. मोफत लसीबाबत केंद्राने निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. मात्र गरिबांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले. महाराष्ट्रात गरिबांना मोफत लस मिळणार असल्याचे हे संकेत तर नाही अशी चर्चा आता रंगू लागली आहे. तसंच राज्यात 8 जानेवारीला सर्व जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. ,

मुंबईत कोरोना लसीकरण आणि नव्या विषाणूसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे बोलत होते. यावेळी कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचे राज्यात एकूण आठ रुग्ण असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

गरिबांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना कोरोनाची लस मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. "सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रण्ट लाईन कर्मचारी, जुना आजार असलेले 50 वर्षांवरील रुग्ण अशा जवळपास तीन कोटी जणांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. उद्या आरोग्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत गरिबांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार आहे. गरिबांना लसीच्या दोन डोससाठी 500 रुपये लादणं हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हा खर्च उचलावा. जर केंद्र सरकारने हा खर्च केला नाही तर राज्य सरकारच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. राज्य सरकारच्या राज्याच्या अखत्यारित येणाऱ्या लोकांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, अस राजेश टोपे यांनी सांगितलं.

8 जानेवारीला लसीकरण 28 आणि 29 डिसेंबर रोजी देशातील चार राज्यात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन झाल्यानंतर संपूर्ण देशभरात ड्राय रन करणार असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. त्यानुसार 2 जानेवारील राज्यातील तीन जिल्ह्यात लसीकरणाचं ड्राय रन झालं. आता 8 जानेवारीला सर्व जिल्ह्यात लसीकरणाची रंगीत तालीम होणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं. या ड्राय रनच्या माध्यमासाठी लसीकरणासाठी यंत्रणा कितपत सज्ज आहेत याचा आढावा घेतला जाणार असल्याचं ते म्हणाले.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे राज्यात 8 रुग्ण ब्रिटनमध्ये आढलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा भारतात शिरकाव झाला असून देशात सध्या 58 रुग्ण आहेत. कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनविषयी माहिती देताना राजेश टोपे म्हणाले की, "राज्यात नव्या स्ट्रेनचे एकूण आठ रुग्ण असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु आहे. नव्या स्ट्रेनबाबत महाराष्ट्र सरकार सजग आहे. ब्रिटनमधून आलेल्या प्रत्येकाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आयसीएमआरने सांगितलेला प्रोटोकॉल आपण पाळत आहोत. जनतेला सांगायचं आहे की आठ रुग्ण आढळले आहेत. लोकांनी जागरुक राहावं, घाबरुन जाऊ नये. परंतु काळजी घेणं गरजेचं आहे. कारण नव्या स्ट्रेनचा संसर्ग झपाट्याने होतो."

महाराष्ट्रासारखा प्रोटोकॉल इतर राज्यांनी पाळावा यासाठी केंद्राला पत्र लिहिणार "7 जानेवारीपासून ब्रिटनच्या हवाई वाहतुकीवरील बंदी उठवण्यात येणार आहे. आपल्याला आपल्या राज्यातील प्रोटोकॉल कायम ठेवणार आहे. परंतु इतर ठिकाणांहून लॅण्ड होऊन जे प्रवासी आपल्या राज्यात येतील, तिथेही महाराष्ट्रासारखा प्रोटोकॉल हवा, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारला पाठवणार आहोत," असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

MVA On MNS : मनसेविना मविआला मुंबईत बहुमत मिळवणं कठीण? मतांचं इक्वेशन संपवणार टशन? Special Report
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण  राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद  टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका
Maharashtra Politics : निवडणूक आली,दोस्तीतली 'दुश्मनी' दिसली;नेत्यांमधील वाद शिगेला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
Embed widget