एक्स्प्लोर
Advertisement
भिवंडीत शेकडो आधारकार्ड कचराकुंडीत, कार्डची खातरजमा करण्यासाठी नागरिकांची झुंबड
भिवंडीतील अजय नगर परिसरामधील कचराकुंडीत शेकडो आधारकार्ड आढळल्याने आज एकच खळबळ उडाली. त्यात आपलं आधारकार्ड तर नाही ना हे पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली.
भिवंडी : भिवंडीमध्ये कचराकुंडीत शेकडो आधारकार्ड आढळल्याने एकच खळबळ उडाली. सर्व कार्ड नवी आणि भिवंडीतील नागरिकांची असल्याने आधार कार्ड आपलीच आहेत का पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
भिवंडीतील अजय नगर परिसरामधील कचराकुंडीत शेकडो आधारकार्ड आढळल्याने आज एकच खळबळ उडाली. त्यात आपलं आधारकार्ड तर नाही ना हे पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे आधारकार्ड कचराकुंडीत मिळाल्याने या निवडणुकीत बोगस मतदान होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. निजामपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्व आधारकार्ड ताब्यात घेतली आहेत.
शहरातील काही स्थानिक नागरिक कचराकुंडीत कचरा टाकण्यासाठी आले असता कचराकुंडीत जवळपास तीनशे ते साडेतीनशे ओरिजनल आधार कार्ड फेकलेल्या अवस्थेत आढळून आले. ही सर्व आधार कार्ड 2015 सालचे असून भिवंडी शहरातील आहेत खडक रोड ,कोंबडपाडा,अजय नगर,गोकुळ नगर इत्यादी परिसरातील हे आधारकार्ड आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement