मुंबई : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज देशभरात डिजिटल शिक्षण कशाप्रकरे दिले जावे यासाठी 'प्रज्ञाता' विशेष गाईडलाईन्स तयार केल्या आहेत. या गाईडलाइन्समध्ये डिजिटल शिक्षण देताना स्क्रीन टाईमबाबत मार्गदर्शन करताना पूर्व प्राथमिक ( प्री प्रायमरी) शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसद्वारे शिक्षण हे 30 मिनिटांपेक्षा जास्त घेण्यात येऊ नये असं सांगण्यात आलं आहे. तर इयत्ता पहिली ते आठवीसाठी 30 ते 40 मिनिटांचे दोन ऑनलाईन सेशनमध्ये क्लास घेऊन शिकवावे. तर इयत्ता नववी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी हे 30 ते 40 मिनिटांचे चार ऑनलाईन सेशन क्लास घेऊन शिक्षण देण्यात यावे, असे या गाईडलाईनमध्ये सूचना देण्यात आल्या आहेत.


आज केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्वीट करून या गाईडलाइन्स शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक यांना डिजिटल शिक्षणसंबंधी मार्गदर्शन म्हणून या गाईडलाइन्स जाहीर करून स्क्रीन टाईमसोबत डिजिटल माध्यमातून शिक्षण घेत असताना मानसिक-शारीरिक स्ट्रेसला कसा दूर करता येईल याबाबत यामध्ये माहिती दिली आहे. 'प्रज्ञाता' गाईडलाईन्समध्ये प्रामुख्याने आठ मुख्य स्टेप्सनुसार ऑनलाईन शिक्षण शिकवतानाच्या मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. यामध्ये प्लान (नियोजन), रिव्हीव्ह ( उजळणी करणे) , अरेंज ( योजने), गाईड( मार्गदर्शन करणे), yalk(talk) (बोलणे), असाईन ( अभ्यास करायला सांगणे), track ( एक विशेष पद्धतीने अभ्यासक्रम पुढे घेऊन जाणे), appreciate (दाद देणे) या महत्वाच्या स्टेप्सवर विशेष सूचना करून त्या कशा स्वरूपात अमलात आणायच्या याबाबत सांगितले गेले आहे.


CBSE 10th Result 2020 | सीबीएसई दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार


कोरोना महामारीच्या काळात पूर्वीसारखं शाळेत दिलं जाणाऱ्या शिक्षणाबाबत विचार करत न बसण्यापेक्षा सद्यःस्थितीत घरी राहून विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून कसा दर्जेदार शिक्षण आपल्याला देता येईल यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करून त्याचा मिश्रण करणं या काळात गरजेचं आहे. त्यामुळे 'या गाईडलाईन्स शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करून एक ऑनलाईन, डिजिटल माध्यमातून शिक्षण देताना एक रोडमॅप किंवा काही मुद्दे दिले जावे आणि ऑनलाईन शिक्षण अधिक दर्जेदार व्हावे यासाठी या गाईडलाइन्स देण्यात येत आहे' पोखरियाल यांनी सांगितलं आहे.


परीक्षा हव्याच, पण त्यासाठी मध्यम मार्ग काढण्याबाबत प्रयत्न करणार; यूजीसीची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह माहिती