एक्स्प्लोर
Advertisement
होळीचा सण उत्साहात साजरा, मसूद अजहर, पबजी, चिनी वस्तूंचं दहन
मुंबईतील विविध भागांमध्ये यंदा दहशतवादाविरोधातील होळी उभारण्यात आली. सर्वसामान्यांनी आपल्या मनातील रागाला होळीच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली
मुंबई : दुष्ट प्रवृत्ती, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, सद्विचार अंगी बाळगण्याचा संदेश देणारा सण म्हणजे होळी. होळीच्या सणाला सामाजिक संदेश देण्याची वर्षानुवर्षांची पंरपरा आहे. मुंबईतही विविध ठिकाणी समाजविघातक गोष्टींचं दहन करुन होलिकोत्सव साजरा करण्यात आला.
वरळी बीडीडी चाळ क्रमांक 79 इथल्या वीर नेताजी क्रीडा मंडळाने आणि घाटकोपरच्या जनता सेवा संघाने यंदा दहशतवादाची होळी उभारली. पुलवामा हल्ल्यानंतर देशात संतपाचे वातावरण आहे. होळीमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलं.
VIDEO | व्यापारी संघटनेच्या वतीने चिनी वस्तूंची होळी | नागपूर
वरळीच्या बीडीडी चाळ 76 आणि 77 मध्ये 'श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'च्या वतीने पबजी गेमवर सर्जिकल स्ट्राईक केला गेला. घाटकोपरच्या भटवाडी विभागातल्या जनता सेवा संघाच्या वतीने 25 फूट उंच होळी उभारण्यात आली. तर नागपूरमध्ये चिनी वस्तूंची होळी जाळण्यात आली.
VIDEO | वरळीत होळीला पबजी गेमचं दहन होणार | मुंबई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement